पुणे

जोशीची बायको आपल्या सोसायटीतील पॉर्नस्टार; असा महिलेबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करत 140 लोकांना पाठवला मेल, कोंढव्यातील खळबळ जनक प्रकार…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे 

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात सध्या अतिशय विचित्र घटना घडत आहेत त्यामुळे तेथील वातावरण तणावाचे झाले आहे साधारण एक महिन्यापूर्वी तेथून एका आतंकवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या प्रतिष्ठित असणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत एक मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवण्यात आला आहे. कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॉर्नस्टार म्हणत तिचा विनयभंग करण्याचा प्रकार कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये  करण्यात आला. या प्रकरणातील संबंधित महिलेने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी शेखर बाबूलाल धोत्रे (रा. फ्लोरेनडेल, उंड्री, पिसोळी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटी मध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून एका व्यक्तीच्या पत्नीचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केला. ती आली नाही का चालायला अशी शेरेबाजी असलेला ई- मेल सोसायटीमधील 140 सदस्यांना पाठवून दिला. तक्रारदार महिलेची बदनामी केल्याबद्दल तिचा पती आणि ती जाब विचारण्यासाठी गेली असता फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की शेखर धोत्रे यानं केली. तुला पोलिसात जायचे तर जा मग मी बघून घेतो काय करायचे ते अशी धमकी देखील धोत्रेने दिली. संबंधितांनी कोंढवा पोलिसात धाव घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.