पुणे

गरीब रुग्णासाठी धावले अक्षय चव्हाण | 45 वे रक्तदान करून दिला मानवतेचा संदेश

सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचा प्रेरणादायी संदेश देणारी घटना समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण यांना महालक्ष्मी ब्लड बँकेमधून फोन आला. इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका गरीब रुग्णाला A निगेटिव्ह रक्ताच्या तीन बॅगांची तातडीची गरज होती.
स्वतःचा रक्तगट A निगेटिव्ह असल्याने अक्षय चव्हाण यांनी कोणताही विलंब न करता महालक्ष्मी ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले. विशेष म्हणजे त्यांचे हे तब्बल ४५ वे रक्तदान ठरले.
येत्या २३ जुलै २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
अक्षय चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक लोकांनी रक्तदान करून जीव वाचविण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान!