पुणे

हडपसरमध्ये 10 हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात? अमोल नाना तुपेंचा प्रशासनाला इशारा

पुण्यातील हडपसर परिसरातील माळवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करत असताना त्यांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयाबाहेरील रस्ता आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यातच रस्त्यावर अनधिकृत प्रवासी वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. शाळेमध्ये शौचालयाची दुरावस्था सुरू आहे पायऱ्यांची कामे सुरू आहेत सुट्टी मध्ये कामे का केले नाहीत विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे कोणतेही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही, मुला मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे याकडे अमोल नाना तुपे यांनी लक्ष वेधले.
अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर विचारणा केली असता, शाळेचे काम शिक्षण देण्याचे असून शाळेबाहेरील बाबी प्रशासनाच्या अखत्यारित येतात, असे उत्तर मिळाल्याचा दावा अमोल तुपे यांनी केला आहे.
यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, शौचालय स्वच्छता शाळेत असणाऱ्या कामांमध्ये सुरक्षितता, अतिक्रमण हटवले नाही आणि बेकायदेशीर प्रवासी वाहनांवर कारवाई झाली नाही, तर हडपसरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
आता शाळा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती पावले उचलते, याकडे पालकांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.