पुणे

शिवसेनेचे पुण्यात वाढलेले संघटन कौतुकास्पद-शिवसेना नेत्या,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे

शिवसेनेचे पुण्यात वाढलेले संघटन कौतुकास्पद-शिवसेना नेत्या,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे

शिवसेनेचे पुण्यात वाढलेले संघटन कौतुकास्पद असून संघटनेची ताकद वाढलेली आहे, मला समाज कार्याला वाव मिळत नसल्याने अखेर उबाठा गट सोडावा लागला, मी वारंवार या बाबत उद्धव ठाकरे यांच्याशी वार्तालाप केला मात्र याबाबत त्यांनी काहीच केले नाही त्यामुळे मी अखेरचा उपाय म्हणून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब  यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी  शिवसेनेत सहभागी झाले,असे प्रतिपादन शिवसेना पक्षाच्या नेत्या,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले, शहरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी व संघटन बैठकीसाठी त्या शिवसेना भवनात आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले

संघटने बाबतीत मी वारंवार  उद्धव ठाकरे यांच्याशी वार्तालाप केला मात्र याबाबत त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळे मी अखेरचा उपाय म्हणून शिवसेनेत सहभागी झाले,नाशिक येथील महिला शिवसैनिकांची  मोठ्या प्रमाणात निन्दानालस्ती झाली मात्र त्याविषयी देखील त्यांनी काही ठोस उपाय योजना केल्या नाहीत परिणामी मला त्यांची साथ सोडण्याशिवाय तारणोपाय नव्हता,देशात नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे देश मोठ्या प्रमाणात पुढे जात असून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य वेगाने विकास करत असून शासन आपल्या दारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत  पोहचत असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेपुढे नेत आहेत, आम्हाला विधानपरिषद उपाध्यक्ष म्हणून नेहमी तटस्थ भूमिकाच घ्यावी लागते, तरीही प्रत्येकाला काहीतरी राजकीय भूमिका असतेच त्याचा विषयी जास्त बोलायची गरज नाही असेही सूचक विधान त्यांनी केले.* *शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर  झालेल्या पत्रकार परिषदेत सध्याच्या राजकारणावर  व राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले

 यावेळी, पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय बाप्पू भोसले,युवासेना सचिव किरण साळी,जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे,युवासेना सहसंपर्कप्रमुख अविनाश खेडेकर ,युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे शहरप्रमुख,महिला शहर प्रमुख लीनाताई पानसरे, पूजा रावेतकर,शहर संघटक श्रीकांत पुजारी, प्रमोद प्रभुणे,शंकर संगम,पुणे शहर प्रवक्ता अभिजीत बोराटे  आणि पुणे शहर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अधिकृत संघटनेचे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.