पुणे

हुशार विद्यार्थ्यांच्या जिवनातील शैक्षणिक उद्देश सफल व्हावा या उदात्त हेतुनेच लोककल्याण प्रतिष्ठाणचे कार्य – विकासअण्णा रासकर

फुरसुंगी ः लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना गरीब, गरजू,होतकरु, हुशार विद्यार्थ्यांच्या जिवनातील शैक्षणिक उद्देश सफल व्हावा या उदात्त हेतुनेच लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले व त्यांचे सहकारी दरवर्षी सातत्याने राबवित आहे. असे प्रतिपादन श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकासअण्णा रासकर यांनी केले.तुकाई दर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतिने लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते,ते पुढे म्हणाले या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ते भविष्यात स्थिर-स्थावर झाल्यावर या योजनेला हातभार लावावा, जेणेकरून आपल्या सारख्या इतर गरजू विद्यार्थ्यांना त्याचा अधिकाधिक लाभ घेता येईल.

प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या १५ वर्षापासून आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी ” लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना ” राबविली जाते. या योजनेतील लाभार्थी कु.सिध्दी देडगे (११ वी सायन्स,आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज,हडपसर),कु.प्रिया चौहान (एफ.वाय.बी.ए.,सेंट मीरा गल्स कॉलेज,पुणे),नितीन पळशिकर(१२ वी कॉमर्स,आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज,हडपसर) या सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षा साठी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,युनिफार्म,शालेय फी,सायकल आदिंचे वाटप विकासअण्णा रासकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले म्हणाले समाजात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकाला विद्याविभुषित होऊन रोजगाराची संधी मिळुन त्याच्या जिवनाची आर्थिक घडी बसावी. हा या योजनेचा हेतू .
सुत्रसंचालन प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष हरीश्चंद्र कुलकर्णी यांनी तर आभार उपाध्यक्ष दिलीप भामे यांनी मानले कार्यक्रम यशस्वितेसाठी इंद्रपाल हत्तरसंग,पांडुरंग शेंडे,अविनाश गोडसे,प्रविण होले,संपत पोटे,भरत चौहान,वसंत कुंभार आदिंनी प्रयत्न केले.