पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी राजेंद्र गारुडकर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीचे पत्र

पुणे (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्षपदी राजेंद्र गारुडकर यांची निवड करण्यात आली,
पुण्यात आयोजित कार्यकमात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर , आमदार सुनिल टिंगरे, शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, मा महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्ता धनकवडे, पालिका माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, बाबुराव चांदेरे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे, आमदार चेतन तुपे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, शहराध्यक्ष आदरणीय दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास व पक्षाची ध्येय धोरणे आचार विचार घराघरात पोहचविण्याचे काम. माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने या पदाच्या माध्यमातुन सार्थ करून दाखवेन असा विश्वास व्यक्त करतो, मिळालेले पद हे शोभेच नसून जबाबदारी आहे असं माझं ठाम मत आहे,या पदाच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न व शहर जिल्ह्यातील जनतेच्या सामाजिक जिवनाशी निगडीत असलेल्या समस्या, सोडवण्यासाठी प्रयत्न करेन.
राजेंद्र गारुडकर
उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट