पुणे

जिवंत मालक ‘मृत’ दाखवून 2.4 कोटींचा गंडा | पुण्यात मोठा घोटाळा

पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी!
निवृत्त एसीपीवरच कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप…

Pune मध्ये एका व्यावसायिकाला जमीन व्यवहारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले…
आणि इथूनच सुरू झाला तब्बल २ कोटी ४० लाखांचा गेम!
तक्रारीनुसार, निवृत्त एसीपीने मुंबईतील जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले…
पण धक्कादायक बाब म्हणजे—
जिवंत असलेल्या जमीनमालकालाच ‘मृत’ घोषित करून व्यवहार पुढे ढकलला गेला!

खोट्या नावाने बँक खाते उघडले…
बनावट कंपनी तयार केली…
आणि पे-ऑर्डर, RTGS, रोख अशा विविध मार्गाने पैसे उकळले गेले.

या प्रकरणी पाच जणांविरुद्ध Chaturshringi Police Station येथे गुन्हा दाखल झाला आहे.
यात आरोपीची पत्नी आणि मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पोलीस तपास सुरू असून, या प्रकरणामुळे विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.