पुणे

‘संभाजी बिडी’ चे नाव तात्काळ बदला… – संभाजी ब्रिगेड बिडी बंडल वरील ‘संभाजी’ नावावर आमचा आक्षेप आहे – संतोष शिंदे

साबळे-वाघिरे प्रा.ली. कंपनीचे उत्पादन असलेली ‘बिडी बंडल’ चे नाव ‘संभाजी’ आहे. सदर कंपनी वारंवार सांगून सुद्धा जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरत आहे. या यापूर्वी बिडी बंडल उत्पादनावर छत्रपती संभाजी महाराजांचा ‘फोटो’ सुद्धा होता. त्यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून विरोध केला. त्यामुळे कंपनीने फोटो छापने बंद केले होते. परंतु नाव बदलण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून सुद्धा आजपर्यंत संभाजी महाराजांचे जाणीवपूर्वक नाव वापरत आहे. त्यामुळे आमच्या भावनांना प्रचंड वेदना होत असून संभाजी महाराजांचा ची तुलना ‘बिडी बंडल’ शी करणं संभाजी ब्रिगेड कदापिही खपवून घेणार नाही. याबाबतचे निवेदन आज संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मा. पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचे देखील व्यसन नव्हते. उत्तम साहित्यिक, आठ भाषा कार, उत्तम प्रशासक, राजनीतीधुरंधर व चारित्र्यसंपन्न राजा अशी छत्रपती संभाजी महाराजांची ओळख होती व आहे. अशा राजांचे नाव ‘बिडी बंडल’वर छापने ही बाब राष्ट्रद्रोही आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही.

साबळे-वाघिरे प्रा. लि. कंपनीने बिडी बंडल चे ‘संभाजी’ हे नाव वापरणे तात्काळ बंद करावे. त्यासाठी बिडी बंडल चे उत्पादन महाराष्ट्र सरकारने तोपर्यंत बंद ठेवावे किंवा थांबवावे. तसेच साबळे-वाघेरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ‘बिडी बंडल’ ची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनावरील ‘संभाजी बिडी’ हे नाव काढून टाकावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुढील काळात राज्य सरकारने जर तात्काळ भूमिका नाही घेतली तर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे साहेब यांच्या सूचनेवरून याबाबतचे ‘निवेदन’ आज निवासी उप जिल्हाधिकारी यांना मा. सौ. जयश्री कटारे मॕडम यांनी स्विकारले.

यावेळी… संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सचिव महादेव मातेरे, शहर उपाध्यक्ष बाळू थोपटे, संभाजी ब्रिगेड सफाई कामगार संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र चंडालिया, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेचे शहर कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड, अजमेर सिंग बंसल, साहिल गायकवाड, रामलालजी जाधव, शंकर अवघडे, सुरेश छदलांनी, राम आय्यर, विजेंद्र चंडालिया आदी निवेदन देताना उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रासह देशाची अस्मिता आहे. त्यांची ची बदनामी आम्ही कदापिही सहन करणार नाही. म्हणून राज्य सरकारने संभाजी बीडी नाव वापरण्यास तात्काळ बंदी घालावी ही नम्र विनंती.

– संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, पुणे जिल्हा.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x