पुणे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप? पटेल-भुजबळ-तटकरेंना डच्चू!

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली असून, या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे गायब आहेत.
विशेष म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना जनरल सेक्रेटरी, तर जय पवार यांना नॅशनल सेक्रेटरी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात नव्या पिढीला संधी आणि जुन्या नेत्यांना डच्चू दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.


या यादीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांनी ही यादी तांत्रिक चुकीमुळे अपूर्ण असल्याचे सांगत लवकरच दुरुस्ती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आता हा फक्त तांत्रिक घोळ आहे की राष्ट्रवादीत मोठे राजकीय फेरबदल होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.