पुणे

हडपसर मधील वाहतूक व अतिक्रमण संयुक्त बैठक : व्हिजन हडपसर मांडणार विकासात्मक भूमिका

हडपसर / पुणे ( प्रतिनिधी)

हडपसर मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला असून याकामी प्रशासनाने कार्यवाही करावी व हडपसरमधील वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक सुरळीत करावी या हेतूने व्हिजन हडपसर च्या वतीने हडपसर मध्ये सर्व विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी साडेचार वाजता हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे बैठक होणार असून या बैठकीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, महापालिका उपायुक्त माधव जगताप, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, हडपसर वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्र जाधव, हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, एमपीएमएल चे हडपसर चे व्यवस्थापक सोमनाथ वाघुले, हडपसरचे सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांच्यासह हडपसर परिसरातील सर्व नगरसेवक या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्यासाठी तुकाई दर्शन येथील नामदेव महाराज मंदिरात व्हिजन हडपसर या संस्थेची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हडपसर मधील वाहतूक कोंडी संदर्भातील विविध प्रश्न व अतिक्रमण बाबत करण्यात करावे लागणाऱ्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करून मुद्दे काढण्यात आले.


मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये हडपसर मधील विविध प्रश्‍नांबाबत व्हिजन हडपसर चे सदस्य एक पीपीटीद्वारे समस्या व त्यावर उपाय या संदर्भात सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून त्यानंतर कार्यवाही करण्यासाठी एक संयुक्त निवेदन देण्यात येईल.
अशी माहिती व्हिजन हडपसरच्या सदस्यांनी दिली
पुण्याच्या पूर्व भागात असणाऱ्या हडपसर उपनगरात विकासकामांबाबत कायम अन्याय होत असल्याने आता जनतेनेच एक दबावगट निर्माण करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीनी एकत्र येऊन व्हिजन हडपसर या संस्थेची स्थापना केली आहे.


व्हिजन हडपसर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिक, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार आहे.

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x