पुणे

पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन हडपसर चा सर्वांगीण विकास : व्हिजन हडपसर च्या बैठकीत आमदार चेतन तुपे यांची ग्वाही

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
पुणे शहरात मेट्रो चा दुसरा कॉरिडॉर सुरू असून सहाव्या फेजमध्ये हडपसरमध्ये मेट्रो सुरू होणार असल्याने अनेक वर्षे लागणार आहेत, त्यामुळे येथील मेट्रोचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा करणार तर येथील वाहतूक कोंडीवर दूरगामी उपाययोजना करण्याच्या हेतूने पावले उचलली जातील निवडणूक संपली आहे, राजकारण बाजूला ठेऊन सर्वपक्षीयांनी हडपसर च्या विकासासाठी एकत्र यावे असे आवाहनन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी केले.


व्हिजन हडपसर च्या पुढाकारातून हडपसर सहायक आयुक्त कार्यालयात हडपसर मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमण या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, हडपसर वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्र जाधव, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पीएमपीचे सोमनाथ वाघुले, हडपसर सहाय्यक आयुक्त सुनील यादव, यांच्यासह प्रभाग समिती अध्यक्षा पूजा कोद्रे, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती आबा तुपे, नगरसेविका प्राची आल्हाट, माजी नगरसेवक सुनील बनकर, पालिकेचे सर्व अधिकारी व व्हिजन हडपसर चे सदस्य उपस्थित होते.


हडपसर मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमण हा प्रश्न गंभीर बनला असून व्हिजन हडपसरच्या पुढाकारातून बैठकीचे आयोजन केल्याने हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे येथील अतिक्रमण व विकासकामांबाबत हितसंबंध जोपासले जाऊ नये जेणेकरून कामांमध्ये अडथळा निर्माण होतो, जागरूक नागरिकांनी या कामी पुढाकार घ्यावा व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विकास कामे व्हावीत याकरिता कार्यरत रहावे असे आवाहन पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले.


हडपसर मधील अतिक्रमण प्रश्न किचकट बनला असून महापालिकेचे अधिकारी गांभीर्याने कारवाई करत नसल्याने आगामी काळामध्ये येथील अतिक्रमण बाबत बाबत तातडीने कारवाई केली जाईल तसेच येथील बहुमजली मंडईचा प्रश्न प्रलंबित असून त्यामुळे वाहनतळाच्या प्रश्नही रखडला आहे त्यामुळे येथील वाहनतळ व बहुमजली भाजी मार्केटचा प्रश्न आगामी काळात मार्गी लावला जाईल असे आश्वासन महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले.


हडपसर मधील अनाधिकृत, बेकायदेशीर वाहनांवर धडक कारवाई केली जाईल व येथील वाहतूक कोंडी बाबत सर्व उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे यांनी दिली
हडपसरच्या नागरी प्रश्‍नांवर अतिशय अभ्यासू पद्धतीने मुद्दे मांडत आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले बीआरटी, फूटपाथ, सायकल ट्रॅक, येथील भाजी मार्केट, अतिक्रमणे व बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाहने यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून यावर दूरगामी परिणाम होणारे उपाय करण्याची गरज आहे त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी आपले हितसंबंध बाजूला ठेवून हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बैठकीचे प्रास्ताविक करताना अनिल मोरे यांनी व्हिजन हडपसर चा मुख्य उद्देश व आगामी काळातील योजना मांडल्या. स्वागत दीपक कुदळे यांनी केले तर सिताराम शरणागत यांनी पीपीटीवर हडपसर मधील प्रश्न व त्यावर करण्याचे दूरगामी उपाय यावर सविस्तर माहिती दिली सूत्रसंचालन दिगंबर माने यांनी केले तर मनीषा राऊत यांनी आभार मानले.

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x