पुणे

हडपसर मध्ये वाहतूक व अतिक्रमण कारवाई व्हिजन हडपसर च्या बैठकीचा परिणाम, हडपसरणे घेतला मोकळा श्वास, अधिकाऱ्यांची बदली रद्द व्हावी

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
हडपसर मधील अतिक्रमण व वाहतूक कोंडीबाबत “व्हिजन हडपसरच्या” पुढाकारातून घेतलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कारवाईला सुरुवात झाली आहे, महामार्ग मोकळा झाल्याने हडपसरमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हडपसर मधील अतिक्रमण व वाहतूक कोंडी हा गंभीर विषय बनला होता यासंदर्भात नागरिकांनी “व्हिजन हडपसर च्या माध्यमातून हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयात एक बैठक घेतली या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे यांच्यासह महापालिका उपायुक्त माधव जगताप वाहतुकचे उपायुक्त पंकज देशमुख व वाहतूक पोलीस अधिकारी व विविध खात्याचे अधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीमध्ये “व्हिजन हडपसरच्या” सदस्यांनी हडपसर मधील वाहतूक व अतिक्रमणाबाबत पीपीटी द्वारे सविस्तर माहिती देऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आवाहन केले होते.
वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त नागनाथ वाकुडे, हडपसर चे वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या सहकार्याने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. यामध्ये हडपसर मधील गांधी चौकातील उड्डाणपुलाखाली मजदूर अड्ड्यामुळे गर्दी होत असल्याने हा मजदूर अड्डा माळवाडी येथे हलविण्यात आला आहे, तसेच रस्त्यावर लक्झरी बसेस लागत असल्याने या चालक-मालक यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या व खासगी पार्किंगमध्ये बसेस लावण्या बाबत चर्चा करण्यात आली आठ दिवसात याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
हडपसर मधील रिक्षा थांबे तपासणी सुरू असून अनाधिकृत रिक्षावर जोरदार कारवाई सुरू केल्या असून मोठ्या प्रमाणात रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत तसेच त्रुटीबाबत रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पीएमपीएमएल काही चुकीचे बस स्टॉप तपासणी सुरू असून काही बस स्टॉप च्या जागा बदलणे बाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पीएमपी व्यवस्थापक सोमनाथ वाघुले यांनी दिली.
फूटपाथ व सायकल ट्रॅक वरील अतिक्रमणे काढण्यात आली असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शॉप सोडून बाहेर केलेले अतिक्रमण यावर मोठी कारवाई घेण्यात आली त्यामुळे रस्ता साफ करण्यात आला आहे तसेच येथील पथारी अधिकृत व्यवसायायिक पुनर्वसनाबाबत चर्चा सुरू झाली असून त्यांचे पुनर्वसन करणेबाबत लवकर उपाययोजना करण्यात येईल
सिरम कंपनीसमोरील पंक्चर बंद करण्यात आले असून नागरिकांच्या मागणीनुसार दोन तासात ऐवजी ते सध्या प्रायोगिक तत्वावर चार तास उघडण्यात ते येणार आहे त्यामुळे मांजरी फाटा चौकात होणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
“व्हिजन हडपसर” ने पुढाकार घेतल्याने आमदार चेतन तुपे यांनीही काही सूचना दिल्या प्रमाणे व नगरसेवकांनी सुचवल्याप्रमाणे वाहतूक विभाग व महापालिकेच्या वतीने कारवाई सुरू झालेली आहे.
त्यामुळे पुण्याच्या पूर्व भागात निर्माण झालेल्या नागरिकांचा “व्हिजन हडपसर” या दबाव गटाची सकारात्मक चर्चा नागरिकांमध्ये आहे.

वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची बदली रद्द व्हावी
“व्हिजन हडपसर” च्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत हडपसर वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी धडाकेबाज कारवाई सूरु केली, मात्र काही राजकीय नेते यामध्ये दुखावले गेल्याची शक्यता लक्षात घेऊन या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, मात्र व्हिजन हडपसर ने बदली रद्द व्हावी यासाठी मोहीम उघडली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

0 0 votes
Article Rating
86 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments