पुणे

नामदेव महाराज दिंडीत वैष्णवांवर दिवेघाटात मृत्यूचा घाला, जेसीबीने चिरडले, नामदेव महाराज यांचे वंशज मृतांमध्ये

हडपसर /पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-
नामदेव महाराज पालखी सोहळा
पंढरपूरवरुन आळंदी- ला जात असताना
दिवेघाटात जेसिबी दिंडीत घुसल्याने 2 वारकरी मृत्युमुखी तर 19 जण जखमी झाले आहेत,3 वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात जेसिबी (JCB) मशीन घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. जेसिबीने चिरडल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये नामदेव महाराजांचे वंशजांचा समावेश आहे. तसेच या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे- सासवड मार्गावरील दिवे घाटात मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती रामभाऊ चोपदार यांनी दिली आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

मिळालेली माहिती अशी की, सोपान तुळसीदास नामदास (नामदेव महाराजांचे वंशज) आणि अतुल हाडशी (खेड) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हडपसर येथील नोबल हाॅस्पिटलमध्ये जखमींना दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, दरवर्षी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणारा आषाढी वारी सोहळा आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरहून आळंदीला पांडुरंगाची वारी निघते. ही वारी पुणे शहरापासून जवळ असलेल्या दिवे घाटात पालखी सोहळ्यात जेसिबी घुसला. यात नामदेव महाराजांचे वंशज सोपान तुळसीदास नामदास यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मजल दरमजल करत हा सोहळा 20 तारखेला अष्ठमीला आळंदीत दाखल होईल. कार्तिकी त्रयोदशीला माऊलींनी संजीवन समाधी घेतली होती. त्याही वेळेस साक्षात पांडुरंग उपस्थित होते, अशी आख्यायिका आहे. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 724 वर्षे आहे. या कार्तिकी वारीला पंढरपूरहुन आळंदीत येणाऱ्या पांडुरंगाच्या ह्या पालखी सोहळ्याचे हे 11 वे वर्षे असून या अपघातामुळे वारकरी संप्रदायातील असांख्य मान्यवर महाराज व संत मंडळींनी नोबेल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आहे.

दिवे घाटात झालेल्या अपघातामध्ये दोन वारकऱ्यांचा अंत झाला तर एक गंभीर जखमी आहे व मोठ्या प्रमाणात वारकरी किरकोळ जखमी आहेत…

Posted by Rokhthokmaharashtra on Monday, November 18, 2019

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x