मंबई शहर

महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर; पक्षाकडे कोणतं खातं वाचा सविस्तर

मुंबई (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन):-
महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते –

एकनाथ शिंदे (शिवसेना) – गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी, पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

बाळासाहेब थोरात (काँग्रेस) – महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

सुभाष देसाई (शिवसेना) – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

नितीन राऊत (काँग्रेस) – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x