पुणे

समाजसुधारक कै. शैलाताई माळी स्मृतिदिननिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण

हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
समाजसुधारक कै.सौ.शैलाताई रतन माळी स्मारक समिती व बचपन वर्ल्ड फोरम यांचे संयुक्त विद्यमाने समाजसुधारक कै. सौ. शैलाताई रतन माळी यांचा एकोणिसावाा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
ससाणेगर येथील ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात 22मार्च व 23मार्च असे दोन दिवस सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यामध्ये व्याख्याने ,समाजसुधारक कै.सौ. शैलाताई रतन माळी जीवनगौरव पुरस्कार ,विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आदी कार्यक्रमाचा सहभाग होता .
प्रसिद्ध व्याख्याते साहित्यिक मिलिंद जोशी यांनी ‘ प्रश्न आजचे उत्तर संतसाहित्याचे ‘ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्यामध्ये ते म्हणाले,आपल्याला आजच्या समस्यांवर संतसाहित्यातून उत्तर मिळते.व आपले जीवन सुखकर होऊ शकते.
प्रसिद्ध एकपात्री कलावंत व व्याख्याते वंदन नगरकर यांनी ‘ चला विचार बदलू या ‘ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना सकारात्मकतेने महत्त्व विविध उदाहरणांनी विषद केले.


याप्रसंगी यशोदीप प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी सायली कुंभार व श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांनी कै..सौ शैलाताई यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.अक्षय घरट प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले तर ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका स्नेहल कुरकुटे यांनी सौ. शैलाताई यांच्या आठवणी सांगितल्या.व विद्यार्थ्यांनी पोवाडा सदर केला.
यावेळी समाजात उत्तुंग कार्य करणाऱ्या संस्थांना समाजसुधारक कै .सौ शैलाताई रतन माळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये मांजरी येथील संत गाडगेबाबा सामाजिक विकास संस्था,नानापेठेतील शिवशक्ती तरुण मंडळ,हडपसर येथील रॉबिंनहूड ग्रुप,आंबेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन संस्था,वारजे माळवाडी येथील आखिल विठ्ठलनगर नवरात्र समिती व हडपसर येथील शंभुमहादेव देवस्थान ट्रस्ट यांचा सामावेश होता.
तसेच विविध क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना . कै. सौ. शैलाताई रतन माळी जीवनगौरव पुरस्काराने नागपूरच्या एकाग्रता प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे सहसचिव अॅड.केशव काकपुरे,रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक अनिल मोरे,दैनिक पुढारी चे वरिष्ठ पत्रकार प्रमोद गिरी,मुंबईच्या पाणिनी मासिकाच्या सहसंपदिका चंद्रकला बाविस्कर,चित्रपट अभिनेते प्रशांत बोगम,ज्येष्ठ समाजसेविका कांतबेन संचेती यांना महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी,महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिता ताई वाघ व महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे सचिव प्राचार्य रविंद्र वाघ यांनी सन्मानित केले.
याप्रसंगी माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका वैशाली बनकर,माजी नगरसेवक सुनील बनकर, माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे, विद्यमान नगरसेवक योगेश ससाणे,विद्यमान नगरसेविका पूजा कोद्रे,प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मदनलाल दरडा , समाजसेवक मोतीलाल शहा, कृषिउत्पन्न बाजार समिती चे उपसभापती भूषण तुपे, सेवासिद्धी फौंडेशनच्या संस्थापिका पुष्पाताई कटारिया,बचपन वर्ल्ड फोरमचे चीफ पेट्रन प्रवीण दोशी,हडपसर मेडिकल अससिएशनचे अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे रॉबिन हूड ग्रुपचे दिनेश चौरेसिया व किशोर तुपे,चंदुकाका सराफ प्रायव्हेट ली.चे प्रतिनिधी अतुल शहा व अरुणा बनकर,भारत विकास परिषदेचे प्रमोद देशमुख,ब्रिगेडियर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी,महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई वाघ, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे सचिव प्राचार्य रविंद्र वाघ संस्थांच्या सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक कै. सौ. शैलाताई रतन माळी स्मारक समितीचे पदाधिकारी यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंदराव धालपे,बामणे, वडु सकर व भापकर यांनी केले.तर आभार अभय पाटील व अजय शिखरे यांनी मानले.
कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद उत्तम होता.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
5 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

My spoᥙse and I stumbled оver here by a different web pagցe and thought
I should chеⅽk things out. I like what I see so now i am following үou.
Look forward to going ovcer yߋur web page for a second time. http://Rimwiki.Rim.edu.bt/mediawiki/index.php/User:MaryjoFrank1257

wow gold
6 months ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

5 months ago

After looking into a number of the blog articles on your website, I truly like your way of writing a blog.
I bookmarked it to my bookmark website list and will be
checking back in the near future. Take a look at my website as well and tell me what you think.

5 months ago

Howdy! Quick question that’s completely off topic. Do you know how to make your site
mobile friendly? My weblog looks weird when browsing from
my apple iphone. I’m trying to find a template or plugin that might be able
to resolve this problem. If you have any recommendations, please share.
With thanks!

2 months ago

El correo electrónico no es seguro y puede haber vínculos débiles en el proceso de envío, transmisión y recepción de correos electrónicos. Si se aprovechan las lagunas, la cuenta se puede descifrar fácilmente.

Comment here

5
0
Would love your thoughts, please comment.x
()
x