पुणे

हडपसर मध्ये घरोघरी शिवजयंती सजावट स्पर्धा ; पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ; उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा गौरव

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
हडपसर/पुणे (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेड आणि मराठा टायगर फोर्स च्या वतीने हडपसर मध्ये शिवजयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती निमित्त हडपसर परिसरातील ज्या शिवप्रेमींनी शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या प्रमाणे आपल्या घरी शिवजयंती साजरी केली आशा स्पर्धकांना एकूण सहा विभागात विभागवार प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले .
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर शिवश्री शेखर पाटील यांचे व्याख्यान झाले त्यावेळी शिवप्रेमींची तुफान गर्दी झाली होती तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, अभियंता मनोज गायकवाड, मराठा सेवा संघ पुणे शहर अध्यक्ष रघुवीर तुपे, स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव, सविता मोरे, सतीश जगताप, उद्योजक बाबासाहेब शिंगोटे, बी.डी खांदवे, रामकुमार अगरवाल, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर मंडळींनी शिवजयंती निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले
जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले समाजामध्ये समता आणि बंधुता टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांचे शिवचरित्र आत्मसात केले पाहिजे
यावेळी समाजासाठी उल्लेखनीय कार्ये करणाऱ्या चार मान्यवरांना पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले यामध्ये रोहिणी भोसले यांना राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ गौरव पुरस्कार, कैलास आवारी यांना छत्रपती शिवाजी महाराज समाज गौरव पुरस्कार, डॉ आशिष डुंगरवाल यांना छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार, विशाल सातव पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज शंभू गौरव पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले.

तसेच सागर चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्यामुळे त्यांचा संभाजी ब्रिगेड व मराठा टायगर फोर्स च्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
तसेच हडपसर मधील विविध क्षेत्रात कार्ये करत असणाऱ्या दीपाली कवडे, सुनंदा देशमुख, प्रांजली चौधरी, रमजान शेख, महेश टेळे पाटील, बाबा लोंढे पाटील, मुकेश वाडकर, दिपक अगरवाल अशा सर्व मान्यवरांचे समाजासाठी उल्लेखनीय असे सामाजिक काम असल्याने त्यांचा संभाजी ब्रिगेड व मराठा टायगर फोर्स च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी मराठा टायगर फोर्स चे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
प्रदेश उपाध्यक्ष निलेश काळे यांनी सूत्रसंचालन तर विशाल लहाने यांनी आभार मानले.
मराठा टायगर फोर्स चे प्रदेश संघटक नामदेव निकम, पुणे शहर अध्यक्ष अक्षय भोसले, शरद वारे, अमोल घाडगे, अभिजित भाट, तात्या घिगे, नितीन जाधव, राम शिंदे, नवनाथ गुंजाळ, धनंजय शेवाळे, अमोल जाधव, उमेश शिंदे, अशोक देशमुख, राजू वारे, अशोक खांडे, सचिन कराळे, सुनील पवार, अरविंद भोसले, आकाश वीर, मयूर माने तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x