पुणे

घरफोड्या व वाहनचोऱ्या करणाऱ्या सराइतास केली जेरबंद हडपसर पोलिसांची कारवाई, साडेचार लाखाचा माल हस्तगत

हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस हडपसर पोलिसांनी अटक केली आरोपींकडून चार लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात प्रतिबंध याकरिता विशेष मोहीम पुणे पोलीस दलातून राबविण्यात येत आहे. अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी विशेष मोहीम राबवली आहे.
हडपसर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस नाईक प्रताप गायकवाड व नितीन मुंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हडपसर गाव येथे सापळा रचून वाहन चोरी करणाऱ्या आरोपीना अटक केली.
पप्पूसिंग घागसिंग टाक वय 23 वर्षे रा. बिराजदार नगर हडपसर असे आरोपीचे नाव असून आरोपीस ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चोरीचे दागिने मिळून आले आहेत, आरोपीकडून अधिक माहिती घेतली असता आरोपीने हडपसर हद्दीत पाच गुन्हे केल्याचे उघडकीस आले चार लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार, यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, युसुफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, राजू वेगरे, गणेश दळवी, नितीन मुंडे, अकबर शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे यांनी केली.

कार्यक्षम अधिकारी लाभले, गुन्हेगार दाबले
हडपसर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनले आहेत, चोऱ्या, दरोडे घरफोडी याबरोबरच परिसरात दशहत माजविणारे आरोपी गजाआड केल्याने गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत नाहीत, हडपसर परिसरात गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात श्री.तांबे यांना यश आले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

Hi there very cool blog!! Guy .. Excellent .. Wonderful .. I will bookmark your website and take the feeds additionally?
I’m satisfied to seek out so many helpful information here within the
publish, we need work out extra techniques on this regard, thank you for sharing.

. . . . .

5 months ago

Se seu marido excluiu o histórico de bate – Papo, você também pode usar ferramentas de recuperação de dados para recuperar as mensagens excluídas. Aqui estão algumas ferramentas de recuperação de dados comumente usadas:

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x