पुणे

प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीला अटक हडपसर पोलीस पथकाची कारवाई

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय 45 रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती.

गौरव शिवराम गायकवाड (वय 19, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय 19, रा. भुजबळ वस्ती, चाकण), शुभम तात्या काळे (वय 19, रा. गंगानगर, फुरसुंगी), अंकित शिवाजी राऊत (वय 26, रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी), अमोल राजू शिंदे (वय 21, गंगानगर, फुरसुंगी), रोहित दीपक भोसले (वय 24, गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहसीन शेख हे रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन वरून उरुळी कांचन येथे जाण्यासाठी थांबले होते. एका रिक्षाचालकाने त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवून घेतले. हडपसर आकाशवाणी येथे आले असता रिक्षाचालकाने रिक्षा थांबवून शेख यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्याने रिक्षाचालकाने त्यांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर इतर साथिदारांना मिस्ड काँल करून पाच साथिदारांना बोलावून घेतले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून शेख यांच्याकडील रोख सातशे रुपये व मोबाईल काढून घेतला. शेख यांनी त्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण दिलीप गाडे प्रसाद लोणारे यांच्या पथकाने गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन काही तासातच आरोपींना पकडण्यात यश मिळविले. 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x