पुणे

चारचाकी गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक करून ३,७०,१००/ चा मुद्देमाल केला जप्त

प्रतिनिधी – स्वप्नील कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे मारुती सुझुकी, इको,या चार चाकी गाड्यांचे सायलेंसर चोरीचे गुन्हे दाखल असुन त्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास सदर चोरीची समांतर तपास करण्याबाबत आदेशित केले होते.
मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आदेशनुसार तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर यांनी तपास पथकातील अंमलदार यांच्या टीम तयार करून त्यांना सायलेन्ससर चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेशित केल्यावरून तपासपथकातील अंमलदार तपासकरत असताना पोलीस अंमलदार पो.ना.संभाजी देविकर यांना दि.१६/४/२०२२ रोजी बातमी तारा मार्फत बातमी मिळाली की सायलेन्सर चोरणारे चोर ते उरुळी देवाची गावच्या हद्दीत येणार आहेत .त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना कळवून वरिष्ठांचे आदेशा वरून इतर पोलीस अंमलदार यांच्या सह उरुळी देवाची गाव हद्दीत सापळा रचून यातील आरोपी नामे १) शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे वय – २१ वर्ष,रा. गोपाळपुरा , आळंदी ता.खेड जि. पुणे २) राम राजेश ढोले वय – २० रा . आळंदी ता.खेड जि. पुणे यांना ताब्यात घेऊन अटक करून त्यांचा कडे सखोल तपास करून नमूद गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट कार व चोरलेले एकूण १४ सायलेन्सर जाळून तोडून फोडून मिळविलेला सायलेन्सर चे कन्वर्टर मधील धातू मिश्रीत चुरा एकूण किंमत ३,७०,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.नमूद आरोपी यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथील खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
१) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर न.२५६/२०२१ भा. द. वि. क.३७९
२) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु. र. न.२८९/२०२१ भा. द. वि. क. ३७९
३) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु. र. न.२५/२०२२ भा. द . वि.क.३७९
४) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु. र .न.१२९/२०२२ भा.द. वि.क.३७९
५) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु. र.न.१३०/२०२२ भा. द. वि. क.३७९
सदर गुन्ह्याचा तपास पोना/ महेश भोगळे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. श्री अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर मा.श्री डॉ. रवींद्र शिसवेसह पोलीस आयुक्त, पुणे शहर मा.श्री नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. नम्रता पाटील , पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ मा बजरंग देसाई, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग राजेंद्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गून्हे) लोणी काळभोर पोलीस स्टेशन याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी स
पो. नी. राजु महानोर यांचे सोबत पोहवा/ नितीन गायकवाड, संतोष होले, पोना/ सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर,अमित साळुंखे, महेश भोंगळे, पो. को. राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे,निखिल पवार, दिगंबर साळुंखे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.