पुणे

“नायगाव येथील सराईत दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश”

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर हद्दीतील एका दुकानातून १४ हजार ७०० रुपये रोख रक्कम चोरी करून नेली होती त्याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत होते.त्या वेळी पोलीस नाईक अमित साळुखे व संभाजी देविकर यांना माहिती मिळाली की, निलेश मिनु कदम राहणार नायगाव ता.हवेली जि.पुणे हा त्याच्या कढील चोरीची मोटार सायकल घेवुन फिरत आहे. व त्यानेच लोणी काळभोर येथील दुकानामधील रोख रक्कम चोरी केलीआहे। त्यानुसार पथकाने सापळा रचुन त्याला शितापिणे ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ दुचाकी व दुकानातील १४हजार ७०० रुपयांची रोकड चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून २ दुचाकी जप्त केल्या आहेत . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयंत हंचाटे करीत आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नरेंद्र सोनवणे, पोलीस नाईक अमित साळुंखे, संतोष राठोड, राजेश दराडे, निखील पवार, बाजीराव वीर, शैलेश कुदळे याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.