पिंपरी-चिंचवड

संस्कार फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे दोन ट्रक रवाना ; बाळकृष्ण खंडागळे यांचा पुढाकार

पिंपरी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन) :- 
रावेत येथील संस्कार सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने मराठा उद्योजक लॉबी, रोटरी क्लब ऑफ़ चिंचवड, अखिल मराठा विकास संघ, क्वीन्स टाउन हौ. सोसायटी, रायगड युवाशक्ती, ऐम ॲडव्हर्टायझिंग यांच्या सहकार्याने कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक पाठवून मदतीचा हात दिला.

या ट्रकमध्ये सुमारे एक लाखाचे औषधे, ७ हजार पाण्याच्या बाटल्या, २० बॉक्स सॅनिटरी नॅपकिन, वॉटर प्युरिफायर, दोनशे पोते नवीन कपडे, शंभर पोते जुने कपडे, दोन हजार बेडशिट, दोन हजार ब्लॅंकेटस, २० पोते तांदूळ, ३० पोते गहू, ५ पोते पीठ, मसाल्याचे पदार्थ, फिनेल, खराटे, मास्क, हातमोजे, स्वच्छतेचे साहित्य, भांडे, खाद्यपदार्थ पाठवले.

सांगलीसाठी पाठवलेला साहित्याचा एक ट्रक ना. जयंत पाटील यांच्या स्वाधीन केला जाणार आहे. तर कोल्हापूरला पाठवलेला ट्रक सत्तारूढ पक्षनेते प्रवीण केसरकर यांच्याकडे स्वाधीन केला जाईल.

यावेळी संस्कार सोशल फौंडेशन व रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, कविता खंडागळे, क्वीन्स टाऊनचे शिरीष पोरेड्डी, विजय गोपाळे, बबन भोसले, मल्लीनाथ कलशेट्टी, सुरेश गारगोटे, विवेक येवले, रविकिरण केसरकर, संदीप पाटील, रमेश सातव, रमेश भोसले, श्री महाले, श्री रणदिवे आदी उपस्थित होते. यावेळी राहुल शिरोळकर प्रशांत ताम्हणकर यांनी मोफत वाहतूकीची सोय केल्याबद्दल सन्मान केला.

सुरेश गारगोटे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
10 months ago

This paragraph is really a pleasant one it assists
new internet people, who are wishing for blogging.

9 months ago

Having read this I believed it was rather informative.
I appreciate you spending some time and energy to put this short
article together. I once again find myself personally spending way too much time both reading and commenting.
But so what, it was still worthwhile!

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x