पुणे

मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी वसंत मुंडे ; राज्य संघटक संजय भोकरे यांची घोषणा ; पुण्यात राज्य कार्यकरिणीच्या बैठकीत झाली निवड

पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील पत्रकार वसंत मुंडे यांची निवड झाली. संघाच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एक मताने निवड करण्यात आली असल्याची घोषणा राज्य संघटक संजय भोकरे यांनी केली.
पंधराव्या राज्य स्तरिय अधिवेशनात ते पदभार स्वीकारतील.
तीन राज्यात जवळपास आठ हजार सभासद असलेल्या संघटनेची धुरा पहिल्यांदाच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या तरुण पत्रकाराच्या खांद्यावर देण्या आली आहे.
महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांची प्रमुख संघटना आणि गोवा, दिल्ली, बेळगाव येथे सभासद असलेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आहे. प्रदेशाध्यक्ष तथा लोकमत वृत्त समूहातील राजकीय संपादक राजा माने यांच्या उपस्थित आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी पुणे येथे संघाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी चार वर्ष संघटनेची धुरा यशस्वीपणे सांभाळली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संघटक संजय भोकरे यांनी नवीन अध्यक्षपदासाठी वसंत मुंडे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी अनुमोदन दिले. पदाधिकारी, सदस्यांनी एकमताने ल समर्थन दिले. बैठकीनंतर याबाबतची घोषणा संघटक संजय भोकरे यांनी केली. पुढील वर्षी पत्रकार संघाच्या पंधराव्या राज्य अधिवेशनात अधिकृत पदभार स्वीकारतील असेही स्पष्ट करण्यात आले. बैठकीला राज्यातील सर्व विभागांचे अध्यक्ष, पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून वसंत मुंडे मागील पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत. संघटनेत जिल्हाध्यक्ष ते प्रदेश कार्याध्यक्ष पदावर त्यांनी काम केले. शासनाच्या औरंगाबाद विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदी संधी मिळाली तेव्हा शासकीय समितीची पत्रकारांची बरोबर खुली चर्चा हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेतला. तालुका पातळीवरील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी म्हणून शासनाकडून धोरणात बदल करून घेतला. उपेक्षित वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आर्थिक पाठबळ उभा करून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. निर्भिड पत्रकार आणि उत्तम संघटन कौशल्य, शांत संयमी, वैचारिक मांडणी, पत्रकारांना न्याय मिळवून देण्या साठी लढा देण्याची भूमिका सातत्याने घेतली आहे. ग्रामीण भागातून काम करताना पत्रकारांसमोर अडीअडचणींना राज्यस्तरावर मांडून, त्या सोडून घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शेती विषयात त्यांचे विपुल लिखाण असून सामाजिक आणि शैक्षणिक विषयावरही त्यांचा अभ्यास आहे. इतिहास संशोधक, ज्येष्ठ पत्रकार
स.मा.गर्गे यांच्या नावाने आद्यवत वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, तर तीन वर्षापासून प्रतिमाह व्याख्यानमालेचा उपक्रम संघाच्या माध्यमातून चालले जातात. अत्यंत उपक्रमशील आणि प्रश्नांची जाण असलेल्या पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. वर्तमानपत्र वाटप करून शिक्षण घेऊन पत्रकारितेत दैनिक लोकसत्ता या प्रमुख दैनिकात अनेक वर्षापासून काम करत त्यांनी संघटनेच्या माध्यमातून आपले नेतृत्व विकसित केले. राज्यातील प्रमुख पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांचा आवाज बुलंद होणार आहे. केवळ प्रश्न मांडायचेच नाही तर ते सोडून घेण्याची नेतृत्वगुण वसंत मुंडे यांच्याकडे असल्याने राज्यातील पत्रकारांनी त्यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी पूर्वीपासूनच संपादक दर्जाच्या व्यक्तीची निवडीची परंपरा मात्र यावेळी खंडित होऊन पहिल्यांदाच ग्रामीण भागातून जिल्हास्तरावर काम करणाऱ्या पत्रकाराला प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. लाडझरी (ता. परळी) येथील छोट्या शेतकरी कुटुंबातील, काम करून शिकलेल्या या तरुणाने कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकर्तुत्वाने बुद्धिवाद्यांच्या माध्यम क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. राज्य कार्यकारणीच्या बैठकीला प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप भटेवरा, कोकण विभागीय अध्यक्ष भगवान चंदे, खानदेश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा, विदर्भ विभाग प्रमुख बाळासाहेब देशमुख, मुंबई उपनगरे प्रमुख डॉ.स्वामी शिरकुल वैदु, बीड चे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

Facebook Page

मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी वसंत मुंडे राज्य संघटक संजय भोकरे यांची घोषणापुण्यात राज्य कार्यकरिणीच्या…

Posted by Rokhthohk Mahararshtra News on Sunday, December 29, 2019

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
7 months ago

When I originally commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and
now each time a comment is added I get three e-mails with the same comment.
Is there any way you can remove me from that service?
Appreciate it!

6 months ago

Magnificent website. A lot of useful info here. I’m sending iit to several paals ans additionally sharing iin delicious.
And certainly, thsnks onn your sweat!

6 months ago

Excellent blog! Do you have any suggestions for aspiring writers?
I’m hoping to start my own site soon but I’m a little lost on everything.
Would you recommend starting with a free platform like WordPress or go for a paid option? There are
so many choices out there that I’m completely overwhelmed ..
Any ideas? Kudos!

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x