पुणे

डीएसके मध्ये गुंतवणूक पडली महागात सुसाईट नोट लिहून गुंतवणुक दाराची आत्महत्या

‘डीएसकें’कडे गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे पुण्यात ठेवीदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 60 वर्षीय तानाजी गणपत कोरके यांनी राहत्या घरी आयुष्य संपवलं.

तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडीमधील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलींच्या लग्नासाठी डी. एस. कुलकर्णी अर्थात ‘डीएसके’मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र सहा वर्षांनंतरही हे पैसे परत न मिळाल्याने कोरकेंनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘माझ्या आत्महत्येला डीसएकेंना जबाबदार धरा, त्यांची पोलिस चौकशी करा’ अशी मागणी केली आहे.

तानाजी कोकरे यांनी 2014 मध्ये आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावे चार लाख तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावे पन्नास हजार रुपये रक्कम डीएसके डेव्हलपर्स यांच्याकडे गुंतवणूक केली होती. 2017 मध्ये त्याची मुदत संपल्यावर रकमेसाठी त्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.

तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी पैसे उधार घेतले. मात्र चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे? याची चिंता कोकरे यांना लागली होती. या चिंतेतून त्यांनी आयुष्य संपवत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. या प्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी, मुलगा आणि काही
नातेवाईकत सध्या तुरुंगात आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x