पुणे

सुपर क्रॉस स्पर्धेत हितेश घाडगेने जिंकली कोल्हापूरकरांची मने हडपसरच्या हितेशचे सुपर क्रॉस स्पर्धेत यश

रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)-
कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या सुपर क्रॉस स्पर्धेत 500 सिसी बुलेट गटात पुण्यातील रॉयल एनफिल्ड प्लॅटिनीयम ऑटोच्या हितेश घाडगेने प्रथम क्रमांक, 350 सीसी गटात तिसरा, रॉयल इनफिल्ड हिमालयन गटात तिसरा, बुलेट ओपन गटात तिसरा क्रमांक पटकावत कोल्हापूरकर रेसिंग प्रेमींची मने जिंकून घेतली.
या स्पर्धेत प्लॅटिनियम क्लबकडून रितू कौर या खेळाडूने महिला ओपन गटात प्रथम क्रमांक पटकावला.
हडपसर येथे रहिवाशी असलेला हितेश घाडगे या धडाकेबाज खेळाडूने भारतात विविध मोटो रेसिंग स्पर्धेत पारितोषिके पटकावत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. कोल्हापूर येथे रॉयल रोडिओ या क्लबने केलेल्या रॉयल रोडिओ सुपर क्रॉस स्पर्धेत बेंगलोर, गुजरात, गोवा,
महाराष्ट्र या राज्यातून नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. मातीच्या ट्रॅकवरील नागमोडी वळणे, उंच सखल मार्ग,वेग आणि नियंत्रणाचा समनव्य साधत,
एकमेकांच्या पुढे जाण्याची चढाओढ साधत हितेश यश खेचून आणले.
पुण्यातून विदेशी मोटर सायकल प्रकारात भारताचा एकमेव आंतरराष्ट्रीय मोटो क्रॉस स्पर्धक युवराज कोंढे देशमुख या सतरा वर्षीय खेळाडून फॉरेन मोटोमध्ये पहिला क्रमांक पटकावत उत्कृष्ट कोशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पिंकेश ठक्कर याने नऊ विविध गटांमध्ये सहभाग नोंदवत स्कुटर क्लास गटात पहिला क्रमांक आणि इतर सात गटांमध्ये पारितोषिके मिळवली.
2020 सालात विविध राज्यात होणाऱ्या मोटो क्रॉस, डर्ट ट्रॅक या स्पर्धांकरिता हितेश जोरदार तयारी करत आहे.
या यशाबद्दल हितेश घाडगे याचे पुणे,मुंबई,
कोल्हापूर, नाशिक, हडपसर येथील क्रीडा प्रेमीनी अभिनंदन केले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x