पुणे

रोड रोमिओंना विचारला जाब शिक्षकाला केली बेदम मारहाण भवरापूर हवेली येथे घडली घटना

शाळेच्या आवारात रोमिओगिरी करणाऱ्या तरुणांना शिक्षकाने जाब विचारल्याने तिघा तरुणांनी शिक्षकाला मारहाण केल्‍याची घटना घडली. शाळेत शिविगाळ, दमदाटी करुन शाळा सुटल्यानंतर शिक्षकाची गाडी थांबवून लाकडी दांडक्याने साह्याने डोक्यात, खांदा व मनगटावर मारहाण करुन हल्ला केल्याची घटना भवरापूर (ता. हवेली ) येथे बुधवार ( दि.५ ) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. शाळेत मुलींना त्रास देण्याच्या उद्देशाने आरोपींनी हे कृत्य केल्याने ग्रामस्थ संतापल्याने त्यांनी गुरूवार (दि.६) अष्टापूर गाव बंद ठेवण्याचा संतप्त पवित्रा घेतला आहे. या घटनेने शालेय मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

अनिल चंद्रकांत कुंजीर (वय-४५ , रा. उरुळी कांचन , ता. हवेली , जि.पुणे) असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिक्षक म्हणून रुजू आहेत. याप्रकरणी विकास तरंगे, महेंद्र गाडे व सचिन कांबळे (सर्व रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) या तिघांवर भा.द.वि. ३३१, ३४१, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व आरोपी मारहाण करुन दुचाकीवरून फरारी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या आवारात दु.४ वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास तरंगे, महेंद्र गाडे व सचिन कांबळे हे दुचाकी मोटरसायकलवरुन घिरट्या घालून आवारात रोमिओगिरी करत होते. संबंधित शिक्षक अनिल चंद्रकांत कुंजीर यांना हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ शिक्षकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. शिक्षकाने जाब विचारला म्हणून या तिघांनी शाळेच्या आवारात शिक्षकाला शिविगाळ व दमदाटी केली. त्यानंतर शाळा सुटल्यानंतर हे आरोपी शिक्षक अनिल कुंजीर हे चारचाकी गाडीतून भवरापूर मार्गे घरी परतत असताना रस्तात गाठून त्यांना गाडीबाहेर काढीत तिघांनी डोक्यात, खांद्यावर व मनगटावर दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर हे आरोपी दुचाकी मोटरसायकलवरुन घटनास्थळावरुन फरार झाले आहेत.

या घटनेनंतर अष्टापूर गावात संतप्त पडसाद उमटले आहेत. गावकऱ्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची केली आहे. गावकऱ्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार (दि. ६) रोजी अष्टापूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी या शाळेत विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक सुविधांची उपलब्धता व आदर्श शिक्षक या शाळेत रुजू असावे म्हणून ग्रामस्थ सातत्याने लक्ष्य पुरवित आहे. दरम्यान राज्यात मेळघाट येथे प्राध्यापिका शिक्षकेवर तरुणाने पेट्रोल टाकूण जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणानंतर राज्य धुसफूस असताना आरोपींनी विद्यार्थ्यांनींचा मार्गावर कौर्यात्मक कृत्य केल्याने शालेय मुली सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
3 months ago

Wow, amazing weblog structure! How long have you been running a blog for?

you made blogging glance easy. The overall look of
your website is magnificent, as neatly as the content material!

You can see similar here ecommerce

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x