सांगली

सांगली येथे मोफत एल एन -४ कृत्रिम हात बसविण्याचे शिबीर हिरक महोत्सवानिमित्त महाराष्ट्र आरोग्य मंडळाचा उपक्रम

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
सांगली (प्रतिनिधी)
एल एन – ४ कृत्रिम हात बसविणे शिबिर
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक ५.२.२०२० रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळ, रोटरी क्लब ऑफ पूना डाउन टाउन व श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद मेडिकल कॉलेज आष्टा, जिल्हा सांगली येथे मोफत एल एन -४ कृत्रिम हात बसविण्याचे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ४२ दिव्यांगाना एल एन -४ कृत्रिम हात बसविण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सांगली जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे अमोल झगडे, रोटरी क्लब ऑफ पूना डाउन टाउनचे रिचड लोबो, विक्रम मेहमी ओनी काकाजीवाला व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्येंद्र ओझा, डॉ. प्रमोद कणप, डॉ. अमित पेटकर, डॉ. सर्फराज लांडगे डॉ. सुनील चव्हाण व डॉ. पत्की उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
20 days ago

The Filipino Channel, commonly known as TFC, is a global subscription television network owned and operated by the Filipino media conglomerate ABS-CBN Corporation. 토토힐주소

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x