सांगली

सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मितीचे कार्यालयाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन : राजकारणात माझ्या हातून संजय निसटला : शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी

श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची घोडदौड कौतुकास्पद असून कॉलेजच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम केले जात आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये या संस्थेने केलेले कार्य संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असल्याचे सांगून नव्याने सुरु केलेले सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मितीचे कार्य सिध्दार्थ भोकरे यांनी जोमाने करावे व सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा उद्देश सार्थक व्हावा. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
सांगली येथील सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
शरद पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले की,
संजय भोकरे माझ्याकडून सटकले, सांगलीच्या राजकारणात संजय भोकरे या तरुणाला मी चांगल्या प्रकारे ओळखतो, तो राजकारणात असताना अनेक वेळा त्याच्याबरोबर चर्चा झाली. चांगला राजकारणी बनेल ही अपेक्षा असताना मात्र त्यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकून पश्‍चिम महाराष्ट्रात एसबीआय ग्रुप, अंबाबाई तालीम संस्था व पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्याला वेगळी ओळख दाखवून दिल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे खा. शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले.
सिध्दार्थ भोकरे फिल्म या निर्मिती कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
संजय भोकरे कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, संजय भोकरे, पराग इनामदार आदिजण उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
379 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments