सांगली

संग्राम देशमुख संचालक असलेल्या कारखान्यात घोटाळ्याचा आरोप, व्हायरल पत्राची खमंग चर्चा, चौकशीची होतेय मागणी

 

सांगली (प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप कऱणाऱ्या भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधूम मध्ये आरोप केल्याने याचा मतदानावर परिणाम होणार का हा सवाल निर्माण झाला आहे.
साखर कारखान्यांमधून अनेक सम्राटांनी मोठ्या प्रमाणात ‘साखर’ खाल्ल्याचे आरोप नियमितपणे होत असतात. पण साखरेच्या नावाने कोट्यवधी रुपये उचलले गेल्याचा आरोप झाला तर? हो पण असा आरोप झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे रिंगणात उतलेल्या संग्राम देशमुख संचालक असलेल्या कारखान्याबाबत आरोप करणारे एक पत्र सध्या व्हायरल झाले आहे. या पत्रानुसार सांगली जिल्ह्यातील Cane Agro Raigaon आणि Green Power Sugar Gopuj या दोन साखर कारखान्यांच्या संदर्भात एक पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रानुसार या दोन्ही कारखान्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेल्या साखरेच्या पोत्यांवर सांगली जिल्हा बँकेतून कर्ज उचलले आहे. पण यातील अनेक पोत्यांम्ध्ये साखर नसून बगॅस म्हणजे भुसा भरला असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

व्हायरल पत्र कुणाचे?  काही पत्रकारांच्या हाती हे पत्र पडताच  या पत्राची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संबंधित कारखान्याच्या साखर गोडाऊनला भेट दिली. या ठिकाणी गोडाऊन अस्तित्वात असल्याचं दिसून आलं. स्थानिकांशी या गोडाऊन संधर्भात चौकाशी केली असता, हे गोडाउन Green Power Sugar Gopuj चे असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्या पत्रात आरोप केल्याप्रमाणे त्या गोडाऊनमधील पोत्यांमध्ये साखर आहे की भुसा हे मात्र समजू शकलेले नाही.

संग्राम देशमुख यांच्या अडचणीत वाढ?
भाजपचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार आरोप करणारे पत्र व्हायरल झाल्याने मतदानाच्या दोन दिवस आधी ऐन धामधुमीत खमंग चर्चा सुरू झाली आहे, या पत्राचा फटका भाजपच्या उमेदवारास बसणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x