मुंबईसातारा

अल्पवयीन मुलाला धमकी देऊन शरीरसंबंध करण्यास पाडले भाग ; वाहिनीचे कृत्य, सातारा मध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
अल्पवयीन तरुणाला धमकी देऊन एका विवाहितेने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये उघडकीस आला आहे. संक्षयित आरोपी महिलेविरोधात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोस्को) सातारा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही पीडित मुलाची वहिनी आहे.

पीडित मुलगा हा १५ वर्षाचा आहे. हा मुलगा आपल्या मावशीच्या गावी यात्रेसाठी गेला होता. त्यावेळी अनावधानाने या मुलाचा महिलेला धक्का लागला. मात्र या मुलाने आपल्याना जाणूनबुजून धक्का दिल्याचा आरोप या महिलेने केला. ‘तू माझ्याशी गैरवर्तन केलं असं मी तुझ्या भावाला सांगेन,’ अशी धमकी या महिलेने त्या मुलाला दिली. धमकावून या महिलेने मुलाला स्वत:शी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं, असा पीडित तरुणाने केला आहे. तसेच यासंदर्भात कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही या महिलेने मुलाला दिली होती.

काही दिवसानंतर या महिलेने मुलाला परत धमकावले आणि पुन्हा त्याला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. आपला भाचा गप्प आहे काही बोलत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याच्या मावशीने काय झालं यासंदर्भात चौकशी केली. त्यावेळी या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या मावशीला सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलाच्या मावशीने थेट पोलिसांमध्ये तक्रार केली. याप्रकरणात संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

1 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
5 months ago

Hello to every one, the contents present at this web site are genuinely
remarkable for people knowledge, well, keep up the good work fellows.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x