पुणे

हडपसर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.मंगेश वाघ सचिव पदी डॉ मंगेश बोराटे, कोषाध्यक्ष पदी डॉ. सुनीता घुले बिनविरोध

रोखठोक महाराष्ट्र न्युज
पुणे (प्रतिनिधी)
हडपसर मेडिकल असोसिएशन च्या 2020-2021 या वर्षासाठी अध्यक्षपदी डॉ मंगेश वाघ यांची बिनविरोध निवड झाली, तसेच सचिव पदी डॉ मंगेश बोराटे, कोषाध्यक्ष पदी डॉ. सुनीता घुले , प्रेसिडेंट ईलेक्ट पदी डॉ. प्रशांत चौधरी, व उपाध्यक्ष पदी डॉ सचिन आबणे आणि डॉ. राहुल झांजूर्णे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची घोषणा हडपसर मेडिकल असोसिएशन चे निवडणूक निर्णय अधिकारी मा.डॉ ज्ञानेश्वर दुसाने व डॉ रसिक गांधी यांनी केली. माजी अध्यक्ष डॉ शंतनु जगदाळे यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीचा कार्यकाळ 31 मार्च २०२० रोजी संपल्यानंतर निवड प्रक्रियेनंतर वरील अध्यक्ष व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हडपसर मेडिकल असोसिएशन च्या कार्यकारिणी सदस्य पदी डॉ चंद्रकांत हरपळे, डॉ. सौ वंदना आबने, डॉ अजय माने, डॉ मनोज कुंभार, डॉ सतीश सोनवणे, डॉ.स्वप्निल लडकत, डॉ हिमांशू पेंडसे, डॉ राजेश कोद्रे, डॉ दीपक भोसले, डॉ अमर शिंदे, डॉ.सत्यवान आटपडकर, डॉ. सचिन आरू, डॉ राजेश खुडे, डॉ राहुल ससाणे, डॉ.अक्षय राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

व स्विकृत सदस्य म्हणून डॉ.अतुल कांबळे, डॉ दीपक शिंदे, डॉ मालोजीराजे तनपुरे, डॉ.आनंद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.

हडपसर मेडिकल असोसिएशन ही संघटना गेल्या २७ वर्षांपासून आरोग्य व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अध्यक्ष पदाच्या नियुक्ती नंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ म्हणाले सर्व माजी अध्यक्षांनी ज्या प्रमाणे हडपसर मेडिकल असोसिएशन च्या सभासदांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केले ते नेटाने करणार,बरोबरच इतर सामाजिक बांधिलकीचे कार्यही जोमाने चालू राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x