पुणे

मदत नव्हे कर्तव्य……. प्रभाग क्रमांक 22 मध्ये जीवनावश्यक वस्तू वाटप ; 15 नंबर भागातील युवकांचा पुढाकार


हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
कोरोनाचा प्रभाव वाढत चालल्याने तसेच लोकघेऊन जायला झालं नाही हडपसर परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे प्रभाग क्रमांक 22 नागरिकांची गरज ओळखून जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन केले आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये झोपडपट्ट्या आहेत गोरगरीब लोक राहतात हातावर पोट आहे, ज्यांना रोजगार नाही, घरांमध्ये किराणा शिल्लक नाही अशा गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता व 15 नंबर परिसरात गणेश मित्र मंडळ व जगदंब प्रतिष्ठान च्या माध्यमातून दोनशे गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश संघटक अनिल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा उपाध्यक्ष सविता मोरे, जगदंब प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर चव्हाण, सचिन तांबे, श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, प्रशांत गायकवाड, आशिष भुतकर , रिजवान शेख, प्रताप उबाळे, जावेद खान, अजीम सय्यद, सोमनाथ मोरे, अनिल चव्हाण, शुभम वीर, शोभीत मोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशल डिस्टन्स चा वापर करून अंतरावर महिलांना उभा करून सॅनिटायझर व मास्क दिले तसेच व किराना वाटप करण्यात आले.
ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले त्या समाजाचे आपण देणे लागतो यामुळे कोरोनासारखा व्हायरस पसरत असताना नागरिकांचे हाल होत आहेत, रोजगार गेले आहे त्यामुळे मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे अशी माहिती सविता मोरे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात जिजामाता वसाहत, डवरी नगर व 15 नंबर परिसरातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असून टप्प्याटप्प्याने प्रभाग 22 मध्ये गोरगरीब गरजूंना किराणा देणार असल्याची माहिती सागर चव्हाण यांनी दिली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x