मुख्य

Coronavirus : देशात 24 तासात ‘कोरोना’चे 6387 नवे रुग्ण तर 170 जणांचा बळी, बधितांचा आकडा 151767 वर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात गेल्या २४ तासात ६ हजार ३८७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने दीड लाखांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत देशात १ लाख ५१ हजार ७६७ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.
या एकूण रुग्णांपैकी ८३ हजार ४ रुग्ण हे अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर देशभरातील विविध कोविड १९ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गेल्या २४ तासात देभरात १७० रुग्णांना मृत्यु झाला. आतापर्यंत देशात कोरोना बाधित ४ हजार ३३७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
Spike of 6387 new COVID19 cases & 170 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 1,51,767 including 83004 active cases, 64425 cured/discharged and 4337 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/wWyo78g4pC
— ANI (@ANI) May 27, 2020
मंगळवारी दिवसभरात देशभरात ३ हजार ९३५ रुग्णांनी कोरोनावर मात करुन ते बरे झाले आहेत. आतापर्यंत देशातील ६४ हजार ४२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत थोडीशी घट झाली असली तरी कोरोना रुग्णांच्या मृत्युमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी एका दिवसात ४ मे रोजी १७५ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर आता एका दिवसात १७० जणांचा मृत्यु झाला आहे.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x