पुणे : वाहन चोरी करणाऱ्या अट्टल वाहन चोरास हडपसर पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून ३ लाख ८५ रूपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे व विनोद शिवले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी येथे सापळा लावून शहारुख रज्जाक पठाण ( वय २३ रा. यवत ता. हवेली, मुळगाव उदाची वाडी, सासवड ता. पुरंदर जि. पुणे) यास पकडले असता त्याच्या ताब्यात होंडा अॅक्टिव्हा गाडी नं. (एम. एच. १२ एल. एच. २६३२ ) दुचाकी मिळून आल्याने सदर गाडीबाबत चौकशी केली असता त्याने ती गाडी शेवाळवाडी येथुन चोरी केली असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी केलेल्या तपासात पठाण याने हडपसर, कोंढवा, बंडगार्डन या परिसरामध्ये वाहन चोरी केल्याचे सांगितले व त्याच्याकडील चोरीच्या ७ गाडया जप्त केल्या. आरोपीस यापूर्वी फरासखाना पोलिस स्टेशन येथे अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून २६ चोरीच्या दुचाकी ३ चारचाकी व १ टॅम्पो हस्तगत करण्यात आला होता. आरोपीकडून हडपसर पोलिस स्टेशनकडील वाहन चोरी एकूण ०२ गुन्हे व कोंढवा पोलिस स्टेशन कडील १ गुन्हा तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील २ असे वाहन चोरीचे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आले असून दोन गुन्हयांचा तपास सुरू आहे.
पुणे शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्हयास प्रतिबंध करुन, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पूर्व प्रादेशिक विभागाचे उपआयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपआयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश साठे, पोलिस निरिक्षक हमराज कुंभार, सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक हिमालय जोशी, युसूफ पठाण, रमेश साबळे, अकबर शेख, सैदोबा भोजराव, शाहिद शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे, प्रशांत नरसाळे, अमित कांबळे यांनी या गुन्हयांचा तपास केला.
#Rokhthok_Maharashtra_News वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद हडपसर पोलिसांची धडक कारवाई

Subscribe
Login
0 Comments