औरंगाबाद

अबब..तब्बल एक कोटींच्या चलनातील बाद नोटा जप्त ;औरंगाबाद पोलिसांची कारवाई

औरंगाबाद – (प्रतिनिधी)

 केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या एक कोटी रुपयाच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेले चौघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. औरंगाबाद शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील हॉटेल ग्लोबल इन येथ छापा मारून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करून चौघांना अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 30 जून रोजी गुन्हे शाखेला गुप्त बातमी मिळाली की, चार जण (ज्यात दोन महिला व दोन पुरुष) केंद्र शासनाने सन २०१६ मध्ये चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी औरंगाबाद मधील हॉटेल ग्लोबल इन, सिंधी कॉलनी, औरंगाबाद येथे येते आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रभारी) गुन्हे, औरंगाबाद शहर तथा पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, गुन्हे शाखा, आरंगाबाद शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे टिमसह माहितीच्या ठिकाणी हॉटेल ग्लोबल ईन (सिंधी कॉलनी) या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका गाळ्यात छापा मारला. तेथे प्रियंका सुभाष छाजेड (रा.औरंगाबाद), नम्रता योगेश उघडे ( रा.औरंगाबाद) या दोघी व नोटा बदलून देणारे एजन्ट मुस्ताक जमशिद पठाण ( रा. आरंगाबाद), हशीम खान बशीर खान (रा. औरंगाबाद) हे घटनास्थळावर आढळून आले. केंद्र शासनाने सन २०१६ मध्ये चलनातून बाद केलेल्या १००० रुपयेच्या एकूण ९६१० नोटा (९६,१०,००० रुपये) व ५०० रुपयांच्या ५६५ नोटा (२,८२,५०० रुपये) असे एकूण ९८,९२,५०० रुपये, वायरची पिशवी व ३७००० / – रुपये किमतीचे चार मोबाईल असा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आला. त्यांच्या ताब्यातून जप्त जुन्या चलनातून बंद झालेल्या नोटा त्यांनी कोठुन आणल्या, कोठे व कोणास देणार होते याबाबत वचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची व असंधिग्द उत्तरे दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे ताब्यातील वर उल्लेखित मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे जवाहरनगर येथे THE SPECIFIED BANK NOTES ( CESSATION OF LIABILITIES ) ACT , २०१७ चे कलम ५,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उप आयुक्त, ( मुख्यालय) मिना मकवाना, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रभारी) गुन्हे तथा पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे, सपोउपनि नितीन मोरे, पोना भगवान शिलोटे, विलास वाघ, प्रभाकर म्हस्के, पोका विशाल पाटील, आनंद वाव्हळ, नितीन देशमुख, विरेश बने, संदीप सानप, प्रभाकर राऊत, अश्वलींग होनराव, परवेज पठाण, गजानन डुकरे, मपोशि संजीवनी शिंदे, आशा कुटे पोना ज्ञानेश्वर पवार (चालक) यांनी केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x