पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” माजी महापौरांच्या कुटुंबात 9 कोरोना पॉझिटिव्ह : महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये ( सीसीसी) उपचार सुरू

(पुणे) : माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर व माजी नगरसेवक सुनिल बनकर यांच्या कुटुंबातील ९ जणांची कोराना टेस्ट पॅाझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यावर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये ( सीसीसी) उपचार सुरू आहेत.
सुनिल बनकर यांची आई विमल दत्तानाना बनकर, चुलते विनायक व त्यांचा नातू राज बनकर, भाऊ सुधीर बनकर, भावजय सारीका बनकर, चुलत भाऊ राज सागर बनकर, भावजय पूनम संदेश बनकर, चुलत भाऊ सुमित बनकर, त्यांची ९ वर्षाची मुलगी देवयानी बनकर या ९ जणांची कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आली आहे.
वैशाली बनकर व माजी नगरसेवक सुनिल बनकर राहत असलेल्या सातववाडी, गोंधळेनगर भागात कोरोनांच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक त्यांच्या घरी व कार्यालयात रोज येत असतात. तसेच या भागातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी घरातील लोक जात असतात. त्यामुळेच कुटुंबातील नागरिकांना कोरोना झाला असल्याचा संशय बनकर यांनी व्यक्त केला.
नगरसेविका वैशाली बनकर व सुनिल बनकर हे दोघेही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रोज प्रभागात फिरत असतात. प्रभागीत अनेक नागरिकांना त्यांनी आर्सेनिक ३० ही होमिओपॅथिक औषधांचे वाटप केले आहे. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीरे देखील त्यांनी मोठया प्रमाणात आयोजीत केली होती. सुदैवाने या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
3 months ago

Wow, marvelous blog layout! How long have you been running a blog for?

you made running a blog look easy. The full look of your site is magnificent, let alone the content
material! You can see similar here sklep online

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x