मुंबई

अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ अभिषेकलाही कोरोनाची लागण

मुंबई – बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.

‘मी स्वत:ला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर, माझे कुटुंबीय आणि संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप आला नसल्याचे अमिताभ यांनी सांगितले.

दरम्यान, आता अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अभिषेक ने देखील स्वत:च ही माहीत ट्विटरवरुन दिली.

अभिषेक म्हणाला कि, ‘माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत.’ अशा आशयाचे ट्विट अभिषेक बच्चन याने केलं आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x