मुंबई

Coronavirus : देशाभरात ‘कोरोना’ संक्रमितांची संख्या 8 लाख 79 हजारपेक्षा जास्त, आतापर्यंत 23 हजारपेक्षा जास्त लोकांनी गमावला जीव

मुंबई :  – चीनच्या वुहानमधून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा संसर्ग देशभरात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि आता त्याने साडे आठ लाखांचा आकडा पार केला आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार, देशात कोरोनाच्या आतापर्यंत 8,79,466 केस नोंदल्या गेल्या आहेत, ज्यापैकी 5,54,429 लोक बरे झाले आहेत. यापैकी 23,187 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 3,01,468 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रात एकुण प्रकरणांची संख्या 2,54,427 झाली आहे. तर, राजधानी दिल्लीत कोरोनाच्या एकुण रूग्णांची संख्या 1,12,494 झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची 7827 नवी प्रकरणे, 173 आणखी मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा 6 हजारपेक्षा जास्त आली आहेत. आरोग्य विभागानुसार राज्यात रविवारी कोरोना व्हायरसच्या सक्रमणाची 7,827 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण रूग्णांची संख्या 2,54,427 वर पोहचली आहे. या सोबतच राज्यात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे आणखी 173 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा वाढून 10,289 झाला आहे.

मुंबईत 1263 नवे रूग्ण

तर, मुंबईत कोरोना व्हायरसचे 1263 नवे रूग्ण समोर आल्याने रविवारी एकुण संख्या वाढून 92,988 झाली. शहरात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,288 झाली आहे. तर, कोरोना व्हायरसच्या 22,540 रूग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 64,872 रूग्ण बरे झाले आहेत, किंवा त्यांन रूग्णालयातून सुटी दिली आहे.

पुण्यात संक्रमितांची संख्या 39,125 झाली

महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या एकुण संक्रमितांची संख्या 39,125 वर पोहचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,097 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तमिळनाडुत प्रकरणे 1 लाख 38 हजारच्या पुढे, 1,966 मृत्यू

तमिळनाडुत सुद्धा सतत रूग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत संक्रमित आढळलेल्या लोकांची संख्या वाढून 1,38,470 झाली आहे. राज्यात आतापर्यंत या महामारीमुळे 1,966 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे आंध्र प्रदेशात संक्रमितांचा आकडा 29,168 वर पोहचला आहे. केरळात कोरोना रूग्णांची संख्या 7,874 झाली आहे.

दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसची 1573 नवी प्रकरणे

राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोना केस कमी होताना दिसत नाहीत. मागील 24 तासात 1573 प्रकरणे नोंदली गेली. अशाप्रकारे दिल्लीत कोरोनाची एकुण प्रकरणे वाढून 1,12,494 झाली आहेत. दिल्लीत मागील 24 तासात 37 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे दिल्लीत एकुण मृतांचा आकडा 3,371 पर्यंत पोहचला आहे. मात्र, दिल्लीत आतापर्यंत एकुण 89,968 लोक बरे झाले आहेत.

दिल्ली सरकारने माहिती दिली की, रविवारी 9443 आरटी-पीसीआर आणि 11793 रॅपिड अँटीजन तपासणी केली गेली आहे. दिल्लीत आतापर्यंत एकुण 789853 कोरोना तपासण्या करण्यात आल्या. राजधानीत कंटेन्मेंट झोनची एकुण संख्या 652 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडु सुरूवातीपासूनच अतिसंवेदनशील आहे. महाराष्ट्रात पहिल्या दिवसापासूनच कोरोनाचा ग्राफ वाढत आहे. तर दिल्ली आणि तमिळनाडुमध्ये चढ-उतार दिसत आहे. या कारणामुळेच दिल्ली आणि तामिळनाडुचे स्थान वर-खाली होत आहे.

गुजरातमध्ये 879 नवी प्रकरणे, आणखी 13 मृत्यू

गुजरातमध्ये सुद्धा संक्रमितांचा आकडा वाढत चालला आहे. राज्यात आतापर्यंत 41,906 संक्रमित आढळले आहेत. रविवारी 879 नवी प्रकरणे समोर आली. राज्यात आणखी 13 नवे मृत्यू झाल्याने आतापर्यंत या व्हायरसने 2,046 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशात 1,403 नवी प्रकरणे

लोकसंख्येच्या हिशेबाने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात सुद्धा कोरोना महामारी वाढताना दिसत आहे. राज्यात आणखी 1,403 नव्या केस सापडल्या आहेत. एकुण रूग्णांचा आकडा 36,476 वर पोहचला आहे. आतापर्यंत 934 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशात 431 नवी प्रकरणे

मध्य प्रदेशात 431 नव्या केससह आतापर्यत 17,632 संक्रमित सापडले आहेत. राजस्थानमध्ये 644 केस सापडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 24,392 रूग्ण समोर आले आहेत. तर ओडिसात 595 नव्या रूग्णांसह एकुण 13,121 रूग्ण संक्रमित आढळले आहेत.

जगात भारत तिसर्‍या स्थानावर

जगभरात कोरोनाने सर्वात प्रभवित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. याच यादीत 34 लाख 13 हजारपेक्षा जास्त संक्रमितांसह अमरिका पहिल्या, ब्राझील (18 लाख 66 हजारपेक्षा जास्त) दुसर्‍या आणि भारत (8 लाख 79 हजार) तिसर्‍या स्थानावर आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
8 months ago

Pretty! This has been a really wonderful post. Many thanks for providing these details.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x