पुणे

लोककला जपणाऱ्या कलावंतांना जगण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा….!वर्षा संगमनेरकर(नृत्यांगना)

पुणे (प्रतिनिधी)
कात्रज मधील नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांनी कात्रज,धनकवडी,सुखसागर नगर भागातील महाराष्ट्रातील लोककला जपणाऱ्या कलावंतांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने”देने समाजाचे” या उपक्रमा अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले त्या निमित्त नृत्यांगना वर्षा संगमनेरकर यांनी आपली सरकारला मागणी केली की,गेल्या सहा महिन्या पासून कॉरोना च्या संकटात सरकारने आम्हा कलावंतांचे गावो गावी होणारे तमाशाच्या कार्यक्रमावर प्रतिबंध घातलेले आहे.परंतु गेल्या सहा महिन्या पासून आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने अनेक कलाकार ज्या मध्ये धोलकी वादक,गायक,साउंड वाले,लाईटवाले,बॅकस्टेज वर काम करणारे अनेक लोक बेकार झाले आहेत त्यांना रोजगार नसल्या मुळे त्यांची उपासमार होत आहे त्या साठी काही कलाकार भाजी विक्री चा व्यवसाय रस्त्यावर बसून करत आहेत परंतु अनधिकृत व्यावसाय म्हणून त्यांच्यावर मनपा कारवाई करत आहेत.पुणे मनपा ने आम्हा कलाकारांना काही दिवस भाजी विक्री करण्याची परवानगी द्यावी.राज्य सरकारने तमाशा कलावंतांना आपली कला गावोगावी सादर करण्याची परवानगी द्यावी.
या प्रसंगी पराग चौधरी,बच्चू पांडे,शंकर जाधव,कुमार पाटोळे,अलका जगताप,वर्षा जगताप,उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन राजाभाऊ कदम यांनी केले होते

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x