पुणे

नागरिकांना शासकीय योजना मिळाव्यात यासाठी शिवसेना कार्यरत ; शिवसेना समनव्यक विद्याताई होडे यांची ग्वाही


रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
हडपसर ( प्रतिनिधी )-
महाराष्ट्रात शिवसेनेचे ठाकरे सरकार असल्यानं आता शासकीय योजनांपासून नागरिक वंचित राहणार नाहीत असा विश्वास सेनेच्या हडपसर विधानसभा समनव्यक विद्याताई होडे यांनी सातववाडी येथे बोलताना व्यक्त केला .
प्रभाग 23 मधील नागरिकांकरिता विद्याताई होडे यांनी आयुष्य मान भारत विमा योजना नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते यावेळी त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी नगरसेवक नाना भानगिरे, माजी नगरसेवक विजय देशमुख, उपशहरप्रमुख समीर अण्णा तुपे, सुरेश हडदरे, शिरीष कोल्हटकर, महेंद्र बनकर, दादा पोमन, अमित गायकवाड, योगेश जैन, अमोल यादव, बाबू काळे, मुकेश वाडकर, दत्ता खवळे, समीर शिंदे, अनिस शेख, गणेश पानकर, अमित यादव, सुहास पडवळ आदी सेना पदाधिकारी उपस्थित होते.
विद्याताई होडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरानी कौतुक केले, आणि प्रत्येक शासकीय योजनेकरिता कसलीही मदत लागत असेल तर सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

Nice blg here! Allso your site lods up very fast! Whhat web hoxt arre you
using? Cann I gget your affiliate link too your host? I ish my site loadced upp
as fast aas yours lol

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x