मुंबई | बाळासामुंबई | बाळासाहेब आणि शरद पवार यांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात विठ्ठल किती दोनच. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.
मी कार्यक्रमाला येताना खूप बॅनर पाहिले. त्यावर भीष्म पितामह असं लिहिलं होतं. मला वाटतं यात काही गैर नाही. मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण पवार आणि बाळासाहेबांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचं तोंडभरून कौतुक केलं. लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ मंत्री जितेंद्र आव्हाडांना द्या. तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल अशी मला खात्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.हेब आणि शरद पवार यांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात विठ्ठल किती दोनच. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.
मी कार्यक्रमाला येताना खूप बॅनर पाहिले. त्यावर भीष्म पितामह असं लिहिलं होतं. मला वाटतं यात काही गैर नाही. मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण पवार आणि बाळासाहेबांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचं तोंडभरून कौतुक केलं. लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ मंत्री जितेंद्र आव्हाडांना द्या. तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल अशी मला खात्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.