पुणे ः जबरदस्तीने मोबाईल चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक करून दोन चोरीच्या घटना, ३ दुचाकी आणि ३८ मोबाईल जप्त केले. विकास ऊर्फ आकाश सुरेश वाघिरे (वय २१, रा. दळवी हॉस्पिटलजवळ, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बळीराम जनार्धन माने (रा. हांडेवाडी, ता. हवेली) यांचा हडपसरमध्ये रिक्षाची वाट पाहत असताना मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांना आरोपीची सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वाघिरे याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीवर चंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपीवर हडपसर, लोणी काळभोर आणि खडकी पोलीस स्टेशनमध्ये विविध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून ३८ मोबाईल, ३ दुचाकी असा पाच लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षिका अनुराधा उदमले, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, दीपक कांबळे, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलिक केसकर, अमित साखरे, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महावीर लोंढे, महेश चव्हाण, बापू लोणकर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.