पुणे

लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना – संजय मोरे – पुणे शहरप्रमुख

हडपसर – लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना दरवर्षी राबवली जाते.याअंतर्गत सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांना सायकल,शैक्षणिक फी,शैक्षणिक साहित्य गणवेश यांचं वाटप तुकाई दर्शन येथे शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी बोलताना संजय मोरे यांनी वरील उद्गगार काढले.
यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य इंद्रपाल हत्तरसंग,प्रभाकर शिंदे,राजाराम गायकवाड,राहुल भाडळे,जनार्दन चव्हाण,अरुणा लडकत,सुषमा सावळगी,
सुवर्णा इनामके,सुरेखा शेवाळे,लोककल्याण पतसंस्थेचे संचालक सुभाष कदम,लक्ष्मण कोल्हे,संपत पोटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय मोरे यांनी यावेळी लोककल्याण प्रतिष्ठानच्या वाटचालीचा गौरव करत राजाभाऊ होले यांच्या रूपाने फुरसुंगी – हडपसर परिसरात कडवा सामाजिक कार्यकर्ता उत्तम जनसेवा करत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी अस्मिता पळशिकर इ.११वी सायन्स,फातिमा खान इ.१२ वी सायन्स, वैष्णवी पालिवाल एफ.वाय.बी.काॕम,अथर्व सातव एस.वाय.बी.काॕम.या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सायकल,शैक्षणिक फी,वह्या,
पुस्तके,शालेय गणवेश यांचे वाटप करण्यात आले.
स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले प्रास्ताविक उपाध्यक्ष दिलीप भामे,आभार कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी तर सुत्रसंचालन प्रदिप जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
योगिता पालीवाल, अथर्व सातव,, प्रवीण होले,प्रसाद होले भरत चौहान किरण जाधव यांनी परिश्रम घेतले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x