पुणे

हडपसर मेट्रोचे काम लवकर सुरू करावे प्रभाग क्रमांक 26 मध्ये वन विभाग गार्डनला माँसाहेब मीना ताई ठाकरे हे नाव द्यावे नगरसेवक नाना भानगिरे यांची मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी)
झपाट्याने वाढणारे हडपसर व येथील नागरी वाहतूक समस्या लक्षात घेता हडपसर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबरोबरच प्रभाग क्र २६ मध्ये वन विभाग मध्ये गार्डन सुशोभीकरण लवकरात लवकर व्हावे याचा देखील पाठपुरावा सुरू केला आहे.
हडपसर भाग झपाट्याने वाढत असल्याने तसेच नवीन गावं पुणे महानगरपालिका मध्ये समाविष्ट केल्या मुळे हडपसर भागातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी मेट्रो च काम लवकरच चालू करण्यासाठी पाठपुरावा केला या वेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रा द्वारे काम लवकरच चालू होईल व या पुढील पाठपुरावा कश्या द्वारे चालू आहे याची माहिती दिली.
नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी निवेदनात म्हटले आहे, प्रभाग क्र २६ मध्ये असलेल्या वनविभाग मोठ्या प्रमाणात झाडी आहे या मध्ये कोणत्याही झाडाला न धक्का लावता तेथे गार्डन करून जेष्ट नागरिक, महिला, लहान मुले-मुली तेथील रहिवाश्यांसाठी साठी गार्डन सुशोभीकरण लवकरात लवकर करावे व माझ्या भागातील नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती पत्र पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांना केली आहे.
या गार्डनला माँसाहेब मीना ताई ठाकरे हे नाव द्यावे असाही आग्रह केला, या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे लवकरच यावर उपाय योजना करू असे पत्र नमूद केले.
पाठपुरावा करून कामे मार्गी लावणार – नाना भानगिरे
प्रभाग क्र २६ मध्ये सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी तसेच ससाणे नगर हंडेवाडी रोड महमंदवाडी रोड तसेच काळे पडळ भागात प्रलंबित असलेला वाहतूकी चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा* या साठी ही पाठपुरावा केला आहे. नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x