पुणे

हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचा उपचाराविना मृत्यू हॉस्पिटल प्रशासनाचा दोष नाही – सह्याद्री हॉस्पिटल

 

पुणे ः प्रतिनिधी
हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विक्रेत्याचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे आज (मंगळवार, दि. ३०) समोर आले. रुग्णाला सोमवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांची तपासणी केली असता, ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले, असे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले.
नारायण शेलार (वय ७०, रा. रामोशी आळी, हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

शेलार यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलांनी हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. त्यावेळी त्यांची तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. दरम्यान, रुग्णाचा पत्नी त्यांच्याबरोबर होती. त्यानंतर त्यांचे नातेवाईक रात्री ९.३० च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी रुग्णाची परिस्थिती क्रिटीकल झाल्याचे हॉस्पिटलने सांगितले. रुग्णाला उपचारासाठी दाखल करावे लागेल किंवा ससूनला न्यावे लागले. आमच्याकडे व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही. त्यानंतर नातवाईकांनी रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असूनही ससून रुग्णालयात न नेता घरी नेले. दरम्यान, रुग्णाचा मृत्यू झाल्यावर फॅमिली डॉक्टरांना बोलावले. त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णाचा अॅटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असूनही सह्याद्री हॉस्पिटल, फॅमिली डॉक्टर आणि नातेवाईकांनी नागरिकांना का वेठीस धरले असा संतप्त सवाल हडपसरवासियांनी उपस्थित केला आहे. कोविड पॉझिटिव्ह असून, रुग्णालयाने त्यांना बाहेर का सोडले, त्यांच्यावर नियमानुसार उपचार का केले नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
दरम्यान, ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ॲडमिट करण्याची व्यवस्था नसल्याचे माहित होते. तरीसुद्धा पेशंट तातडीनं हलवा असे सांगून रात्री 1.30 सुमारास रुग्णाला रुग्णालयातून बाहेर का काढण्यात आले. नागरिकांना मृत व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानेतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सह्यादी प्रशासनाकडून योग्य उपचार
नारायण शेलार यांचा मृत्यू उपचारभावी झाला असा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे, शेलार यांना सह्याद्री हॉस्पिटलच्या हडपसर मध्ये आणण्यात आले ते कोव्हीड पॉझिटिव्ह होते, त्यांना ऑक्सिजन आणि आय सी यू बेड ची गरज होती. त्यावेळी हडपसर युनिट मध्ये कुठलीही बेड उपलब्ध नव्हता आणि याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. इतर ठिकाणी ते बेड शोधत असतांना पेशंटला इमर्जन्सी रुम मध्ये नेण्यात आले व तिथे आवश्यक उपचार देऊन स्थिरस्थावर करण्यात आले. त्यांना लगेचच ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी हलवण्याचा सल्ला दिला गेला आणि त्यासाठी नातेवाईकांना ट्रान्सफर लेटर देण्यात आले.
सह्याद्री हॉस्पिटल

खासगी हॉस्पिटलमध्ये होतेय रुग्णांची लुबाडणूक?
कोव्हीड 19 ची तिसरी लाट अतिशय घातक नाही, पण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह होत असताना हडपसर परिसरात बेडसाठी वणवण करावी लागत आहे, त्यातच खासगी रुग्णालयांकडून मनमानी बिले आकारली जात असल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक संतप्त आहेत, खासगी बिलांवर महापालिका व राज्य शासन नियंत्रण कधी ठेवणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे, आधीच मंदी, रोजगार नाही त्यातच कोरोना ग्रस्त रुग्ण आजारापेक्षा खासगी रुग्णालयाच्या मनमानी बिलामुळे चक्रावले आहेत.

जास्तीत जास्त नागरिकांना लस द्या
कोव्हीड 19 वर मात करण्यासाठी व संसर्ग थांबविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याची गरज आहे, पुण्यातील वाढता संसर्ग पाहता लसीकरण यंत्रणा वाढवून 30 वर्षापुढील नागरिकांना तातडीने लस द्यावी जेणेकरून संसर्ग थोपविण्यास मदत होईल, शासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, लसीकरण यंत्रणा सक्षम करावी.
नितीन टकले
उद्योजक

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x