पुणे

अग्रवाल मारवाडी चेंबरच्या वतीने विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सन्मान

पुणे : अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एंड एज्यूके शनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना MSME STAR BUSINESS NATIONAL AWARDS ने एका कार्यक्र मात सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द बांधकाम व्यवसायिक भीमसेन अग्रवाल आणि प्रमुख पाहुणे म्हणून कॉग्रेस नेता राजेंद्र परसावत उपस्थित होते. अग्रवाल मारवाडी चेंबरचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल, भीमसेन अग्रवाल आणि राजेंद्र परसावत यांच्या हस्ते गुजरातचे जिग्नेश जोशी यांना Excellence in Infra Sector, बेंजर पेंटसचे संचालक प्रदीप अग्रवाल यांना Excellent Performance in Manufacturing Paints, कमलराज बंसल यांना Excellent Performance in MSME Sector, विजय टयूब्सचे संचालक हंसराज सिंघल यांना Best Performance in Steel Distribution , विजय स्टील ट्रेडर्सचे विक्रम बंसल यांना Best Performance in Steel Sector, श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्स प्रा.लि.चे संचालक नरेंद्र गोयल यांना Excellent Performance in Genset Sector, अजय बाबूलाल शाह यांना Excellent Performance in Business, ज्यूली बैग्स यांना Excellent Performance in Bags Industry, धानोरी येथील राकेश अग्रवाल श्रीराम हाऊ सिंग यांना Excellent Performance in Housing Sector, तेजल शाह यांना Excellent Performance in Insurance, मीठालाल जैन यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करणत आले. शॉल और सन्मानचिन्ह पुरस्काराचे स्वरूप होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x