पुणे

ब्रेकिंग न्युज : मुंबई वगळून राज्यात तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक – ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : (Rokhthok Maharashtra Online) –  

आज मंत्रिमंडळा समोर निर्णय घेण्यासाठी काही प्रस्ताव होते. दरम्यान, पुणे  पिंपरी चिंचवड महापलिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग असणार आहे. त्यावर आज (बुधवार) मंत्री मंडळात निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज सकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये मनपा निवडणुकीसदंर्भात चर्चा झाली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई वगळता सर्वच महापलिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या होणार्‍या निवडणूकांमध्ये सरशी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आता त्रिसदस्यीय प्रभाग होणार असल्यामुळे अनेकांचे फावले जाणार आहे. आज होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे..

मुंबई वगळता सर्वच महापलिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.