पुणे

पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते तर कार्याध्यक्षपदी अँड. श्रुती गायकवाड यांची निवड

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात युवतीच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी , त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी सक्षम युवती सेल देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस असून, आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी , आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब, आदरणीय खासदार तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सुप्रियताई सुळे व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सुषमा सातपुते यांना संधी देण्यात आली असून, अँड . श्रुती गायकवाड या कार्याध्यक्ष म्हणून काम करतील. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.