पुणे

रायडर हितेश घाडगे व स्केटिंग विक्रम केलेली मनस्वी पिंपरे यांचा खासदार, आमदारांकडून सन्मान

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
हिमाचलप्रदेश येथे पार पडलेल्या रॅली ऑफ हिमालया या आंतरराष्ट्रीय रॅली मध्ये पुण्यातील हडपसरचे रायडर हितेश घाडगे यांनी भारतात प्रथम क्रमांक मिळविला.
भारतातून 75 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील यशाबद्दल खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विधानभवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात हितेश घाडगे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हडपसर चे आमदार चेतन तुपे, शिरूरचे अशोक पवार, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी अध्यक्ष अमोल हरपळे, स्प्रिच्युअल सोशल अँड चॅरिटेबल फाऊंडेशनचे राष्ट्रीय महासचिव अनिल मोरे, महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे, शामराव शिंदे आदी उपस्थित होते.

कोंढव्यातील लक्ष्मीनगर मध्ये राहणाऱ्या मनस्वी विशाल पिंपरे या अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीने 81 तासांत 3 दिवसांत 10 तास स्केटिंग केले आहे, अनेक विक्रमाना तिने गवसणी घातली आहे या यशाबद्दल खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते यावेळी सन्मान झाला.

अनेक सामान्य कुटुंबातील खेळाडू परिस्थिती वर मात करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवितात, त्यामागे अनेकांची प्रेरणा असते, कोणत्याही सुविधा नसताना मिळविलेले यास वाखाणण्याजोगे असते, सरकारकडून अशा खेळाडूंना प्रोत्साहन व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील हितेश घाडगे व मनस्वी पिंपरे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल खुप कौतुक आहे, आगामी काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनवे विक्रम प्रस्थापित करावेत यासाठी शुभेच्छा आहेत, शासनाकडून त्यांना हवी ती मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार चेतन तुपे यांनी याप्रसंगी सांगितले.

महापौरांच्या हस्ते हितेश घाडगेचा सन्मान…
विधानभवन येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हितेश घाडगे या रायडरचा सत्कार झाला, हितेशच्या या यशाबद्दल महापौरांनी कौतुक केले. यावेळी उद्योजक प्रसाद बालवडकर उपस्थित होते.
तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी हितेशचा सन्मान करून यशाचे कौतुक केले यावेळी अभिजित शिवरकर, गणेश फुलारे आदी उपस्थित होते.

हितेश ला मिळावा शिवछत्रपती पुरस्कार…
खेळात योगदान दिल्याबद्दल खेळाडूंना राज्य शासनाकडून मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, हितेश घाडगे या सामान्य कुटुंबातील युवकाने कोणतीही पार्श्वभूमी नसताना कष्टाच्या जोरावर अनेक स्पर्धांमद्धे सहभाग घेत यशाचा झेंडा फडकविला आहे. या खेळाडूस “शिवछत्रपती” पुरस्काराने सन्मान करावा अशी मागणी करण्यात येत आहे.