पुणे

तृतीयपंथीचा खून तृतीयपंथी कडून गुन्हेगाराला ८ तासात ठोकल्या बेड्या

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख (ता. हवेली)

बोरीभडक येथील तृतीयपंथी मगरध्वज मारुती बंडेवाड (वय-२६, रा. थेऊर, ता. हवेली) याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर खुनाचा छडा लावून तृतीयपंथी आरोपीला ८ तासाच्या आत अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण (वय – २६, सध्या रा. थेऊर ता. हवेली, मूळ रा. रुई धानोरा ता. गेवराई जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या तृतीयपंथी आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीभडक (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील गायरानात रविवारी (ता. २१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना तृतीयपंथी मगरध्वज बंडेवाड मृतदेह याचा आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मगरध्वज याचा दोन दिवसापूर्वी खून झाल्याचा संशय पोलिसांनी आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर दिशेने तपास करीत असताना, थेऊरफाटा ते सहजपुर फाटा परिसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली. सी.सी.टि.व्ही फुटेजमध्ये मगरध्वज बंडेवाड याच्याबरोबर त्याचा सहकारी काजल चव्हाण आढळून आला. पोलिसांनी काजल चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, नागरिक तुलाच जास्त पैशे का देतात या द्वेषातून मगरध्वजचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, स्वप्नील लोखंडे, सचिन काळे, संदीप येळे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, गणेश करचे, राजीव शिंदे, संदीप देवकर, पोलीस नाईक महेंद्र चांदणे, रामदास जगताप, मेघराज जगताप, निखिल रणदिवे, पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर, मारुती बाराते आणि किरण तुपे यांच्या पथकाने केली आहे.