दि. २५/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्र मध्ये कान्हुरच्या प्रथमेश मिडगुले याला एल एन ४ कृत्रिम हात बसवण्यात आला. प्रथमेश चा हात कडबाकुट्टीमध्ये कापला गेला होता. एल एन ४ कृत्रिम हात अमेरिकेतून एल एन मिडोज या संस्थेतून येतो, हा हात अत्याधुनिक, सोपा, सुटसुटीत, वापरण्यास सोपा आहे. या कृत्रिम हातामुळे प्रथमेशचे आयुष्य बदलून जाणार आहे, त्याला दैनंदिन कामे करण्यास मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य मंडळ व रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सानेगुरुजी आरोग्य केंद्रांमध्ये एल एन ४ कृत्रिम हाताचे कायमस्वरूपी केंद्र सुरू आहे. प्रत्येक शनिवारी दुपारी २-०० वा. हात बसवण्यात येतात. दि. २२/१२/२०२१ रोजी सकाळ पेपरच्या बातमीची दखल घेऊन प्रथमेशला एल एन ४ कृत्रिम हात आज बसवण्यात आला. श्री. अमोल झगडे यांनी हात बसला व श्री. हसनमीया शेख यांनी हात वापरण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव श्री. अनिल गुजर, रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊनचे रो. प्रदीप मुनोत, रो. जितू मेहता, विद्याधाम विद्यालय कान्हूर मेसाई ता. शिरूर जि. पुणे चे मुख्याध्यापक श्री. अनिल शिंदे प्रथमेशची आई सौ. सविता मिडगुले, सोमनाथ राक्षे, निलेश खरडे, सोमनाथ पिंगळे, सुनील जिते हे होते.
कान्हूरच्या प्रथमेशला मिळाला एल एन ४ कृत्रिम हात
December 27, 20210

Related Articles
July 30, 20230
डॉ.दादा गुजर हॉस्पिटल व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी शिबीर
https://www.youtube.com/watch?v=Nj-uyoa7ZiY
डॉ.दादा गुजर हॉस्पिटल, हडपसर पुणे व रोटरी क्लब ऑफ पुणे vibrant
Read More
June 7, 20250
उद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार
पुणे, दि. ६ : समाजाच्या विकासासाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दि
Read More
October 13, 20240
“लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांना नियोजन मंडळाचा साडेतीन कोटी निधी, सरपंच सविता लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
लोणी काळभोर (स्वप्नील कदम)
लोणी काळभोर गावच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न
Read More